पुन्हा येत आहेत डायनासोर 'ज्युरासिक वर्ल्ड 3' मधून

शनिवार, 22 फेब्रुवारी 2020 (09:12 IST)
डायनासोवर अनेक सिनेमे तयार करण्यात आले आहेत.आता पुन्हा एकदा डायनासोरवर आधारीत ज्युरासिक वर्ल्ड 3 हा हॉलिवूड सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या प्रीप्रॉडक्शनवर सध्या जोरात काम सुरू आहे.
 
ज्युरासिक वर्ल्ड 3 चे डायरेक्टर कॉलिन ट्रेव्होरो  यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, प्रीप्रॉडक्शनवर काम सुरू आहे. लवकरच सिनेमा रिलीज केला जाणार आहे. कॉलिन यांच्या या ट्विटमुळे चाहत्यांनी उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यांनी डायनासोरच्या मॉडेलचा एक फोटोही शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, “रेडी.”
 
फॉलन किंगडमनं ज्युरासिक वर्ल्डच्या पोस्ट क्रेडिट सीनमधून संकेत दिले आहेत की, डायनासोर माणसाच्या वस्तीत प्रवेश करतो. या सिनेमाच्या स्टोरीच्या पुढील प्लॉटमध्ये सस्पेंस कायम ठेवण्यासाठी स्टोरीचा आणखी खुलासा करणं टाळलं आहे. परंतु लवकरच याबाबत माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे 2021 च्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे ज्युरासिक वर्ल्ड 3  आहे. या सिनेमात ख्रिस पॅट  आणि ब्रिस डॅलास हॉवर्ड  असणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख दीपिका 'या' फोटोमुळे झाली ट्रोल