अभिनेत्री दीपिका पादुकोणने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकापाठोपाठ एक असे अनेक फोटो शेअर केले. या फोटोतील तिचा अवतार पाहून लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले. या फोटोद्वारे दीपिका Balmain या नावाचा एक फ्रेंच ब्रँड प्रमोट करतेय. बलमा...बलमा... फॅशन का है ये बलमा... असे हे फोटो शेअर करताना तिने लिहिले.
या फोटोत दीपिकाने ब्लॅक पँटसूट व ब्जेजर घातलेला दिसतोय. सोबत ब्लॅक कलरच्या हाय हिल्स आणि डोक्यावर पदर असा तिचा अवतार आहे. काही लोकांना तिचा हा अवतार आवडला. पण अनेकांना मात्र तो जराही आवडला नाही.
‘बिल्कुल भी बात नहीं बन रही’, असे एका युजरने तिच्या या फोटोवर कमेंट करताना लिहिले. तर एकाने तिच्या या फॅशन सेन्सला ‘डिजास्टर’ असे नाव दिले. ‘तुझी ही डिजास्टर फॅशनची निवड पाहून मी केवळ इतकेच म्हणू शकतो की, फॅशन आणि काहीही उचलले अन् घातले यात फरक असतो,’ असे या युजरने लिहिले.
एका युजरने हा सर्व रणवीर सिंगचा प्रभाव असल्याचे म्हटले. तर एकाने ‘बोरिंग’ असे लिहित दीपिकाला ट्रोल केले. हा ड्रेस ट्राय करताना तुझ्या डोक्यात नेमके काय सुरु होते, हे जरा सांगशील? असा प्रश्न एका युजरने तिला केला.