Dharma Sangrah

इरफानच्या कोब्रा चित्रपटाचा टीझर चर्चेत

Webdunia
बुधवार, 13 जानेवारी 2021 (15:21 IST)
माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. इरफान पठाण दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रमसोबत ‘कोब्रा' या चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. सेव्हन स्क्रीन स्टुडिओच्या या चित्रपटाची निर्मिती ललित कुमार यांनी केली आहे. 2020 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार होता. पण, कोरोनामुळे रिलीज डेट टळली होती. त्यामुळे इरफानचा अभिनय पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये लागून राहिली होती. इरफानचा अभिनय चाहत्यांच्या कितपत पसंतीस उतरतो, हेचित्रपट पाहिल्यानंतर समजणार आहे. 
 
सेव्हन स्क्रीन स्टुडिओने कोब्राच्या टीझरबाबत एक टि्वट केले आहे. अजय ज्ञानमुथू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट हिंदीबरोबर तमिळ, तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे. टीझरमध्ये इरफानच्या अभिनयाची एक झलक पाहायला मिळत असून हा टीझर 1 मिनिट 47 सेकंदाचा आहे. चित्रपटात अभिनेता विक्रमची भूमिका एका गणितज्ज्ञाची आहे. तर इरफानची भूमिका एका इंटरपोल ऑफिसरची आहे. ए.आर. रेहमान यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटातील  ’थम्पी थुल्ल' हे गाणे यापूर्वी रिलीज झाले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

गेम ऑफ थ्रोन्स फेम अभिनेत्याचे निधन

Fun Time गण्याने धोब्या कडे धोतर धुवायला टाकले

Dhurandhar 2 Controversy ‘धुरंधर २’ च्या यशावर संकटाचे सावट; एका गाण्यामुळे आदित्य धर कायदेशीर अडचणीत

अभिनेत्रीने रणवीर सिंगला आपला लकी चार्म म्हटले; त्याच्यामुळेच चित्रपट निर्मात्यांनी तिची दखल घेतली

हिरवीगार दरी आणि थंड हवेचे ठिकाण जिथे प्रत्येक ऋतू सुखद; ऊटीजवळील काही सर्वोत्तम ठिकाणे नक्कीच भेट देण्यासारखी

पुढील लेख
Show comments