Dharma Sangrah

‘कोल्ड प्ले’ला हिरवा कंदील

Webdunia
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (17:15 IST)
येत्या १९ नोव्हेंबरला  आयोजित केलेल्या ब्रिटिश रॉक बँडच्या ‘कोल्ड प्ले’ला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, भविष्यात याचिकाकर्त्यांची मागणी मान्य केली, तर मनोरंजन कर भरावा लागेल, असे स्पष्ट करत, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आयोजकांकडून तसे हमीपत्र घेण्याचे निर्देश दिले आहेत. कोल्ड प्ले’ला मनोरंजन कर लागू न करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला, सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे व अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. याप्रकरणात एमएमआरडीएनेही या कार्यक्रमासाठी मैदान देताना भाड्यात २५ टक्के सवलत दिली.एमएमआरडीएच्या याही निर्णयाला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे.मात्र, उच्च न्यायालयाने भाड्यात सवलत द्यायची की नाही, याचा अधिकार एमएआरडीएला असल्याने यात  हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केलेआहे.  
 
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी

सर्व पहा

नवीन

शिव ठाकरे 'द ५०' चे विजेते ठरले

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

'धुरंधर २' ने शनिवारी प्रदर्शित झाल्यापासून ३०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला

'चुंबक'च्या सेटवर संदीपा धरला नीना गुप्ता यांच्याकडून मिळालेला विशेष सल्ला

रोहित शेट्टीच्या घरातील गोळीबार प्रकरणात पोलिसांना मोठे यश; उत्तर प्रदेशात १४ व्या आरोपीला अटक

पुढील लेख
Show comments