Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईच्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये साहिल खानविरोधात तक्रार

Webdunia
गुरूवार, 20 एप्रिल 2023 (07:56 IST)
Instagram
अश्लील कमेंट करणे आणि सोशल मीडियावर तिच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी साहिल खानवर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. याशिवाय महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये साहिल खानविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
दाखल करण्यात आलेल्या एफआयआरचा दाखला देत पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला ओशिवरा परिसरातील रहिवासी असून तिचे फेब्रुवारी 2023 मध्ये जिममध्ये पैशांवरून एका महिलेशी भांडण झाले होते. यावेळी आरोपी महिला आणि साहिल खान यांने तक्रारदार महिलेला शिवीगाळ करत धमकी दिली होती. साहिल खान याने आरोपी महिलेसोबत मिळून तक्रारदार महिला आणि तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट अपलोड केल्या होत्या. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवर ओशिवरा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांचा समावेश करत साहिल खान आणि त्याच्या सोबतच्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
पोलीस अधिकाऱ्यांचे असेही म्हणणे आहे की, आरोपी महिलेचे तक्रारदार महिलेच्या पतीसोबत प्रेमसंबंध होते आणि तिने पीडितेच्या पतीविरुद्धही पोलिसात तक्रार दाखल केली होती.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शाहिद कपूरच्या 'देवा'चा ट्रेलर रिलीज

अभिषेक बच्चनच्या 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडिओवर झाला

लवयापाचे रोमँटिक गाणे 'रेहना कोल' रिलीज

एकेकाळी घरोघरी भटकावे लागले होते, आज आहे सर्वात प्रसिद्ध गीतकार

भूल भुलैया 2 नंतर तब्बू या हॉरर चित्रपटातून प्रेक्षकांना घाबरवणार

सर्व पहा

नवीन

Mahakaleshwar श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग

शाहिद कपूरच्या 'देवा'चा ट्रेलर रिलीज

सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली

अभिषेक बच्चनच्या 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडिओवर झाला

महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी एक प्राचीन देवगिरी किल्ला दौलताबाद

पुढील लेख
Show comments