Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Dinesh Phadnis : दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आला नसल्याचे दयानंद शेट्टी यांनी सांगितले

Webdunia
सोमवार, 4 डिसेंबर 2023 (20:25 IST)
दिनेश फडणीस हेल्थ अपडेट दिनेश फडणीस सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते व्हेंटिलेटरवर गेल्याचे वृत्त आहे. आता अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत एक अपडेट समोर आले आहे. सीआयडीचे सहअभिनेते दयानंद शेट्टी यांनी सांगितले की, त्यांना हृदयविकाराचा झटका आला नाही.
 
टीव्ही अभिनेता दिनेश फडणीस रुग्णालयात दाखल असल्याची बातमी आहे. 1 डिसेंबर रोजी अभिनेत्याची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे.त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आले होते. मात्र आता अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत एक अपडेट समोर आले आहे.

वृत्तानुसार, सीआयडीचे सह-अभिनेते दयानंद शेट्टी यांनी दिनेश यांच्या आरोग्याबाबत अपडेट दिले आहे. अभिनेत्याने त्यांना  हृदयविकाराचा झटका आला नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.
 
दिनेश फडणीस यांना हृदयविकाराच्या झटक्याची बातमी कळताच सीआयडी शोची संपूर्ण कलाकार त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचली. अभिनेता सध्या मुंबईच्या तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल असून मृत्यूशी झुंज देत आहे.
 
दिनेश फडणीस यांनी 'सीआयडी'मध्ये अनेक वर्षे काम केले. 1998 ते 2018 पर्यंत त्यांनी फ्रेडरिकची भूमिका साकारली. याशिवाय 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्येही ते  छोट्या भूमिकेत दिसले होते . याशिवाय ते  आमिर खानचा चित्रपट 'सरफरोश' आणि हृतिक रोशनच्या 'सुपर 30'मध्येही दिसले आहे.
 
अभिनेता दिनेश हे नेहमी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. अभिनेत्याची प्रकृती खालावली असल्याने त्यांचे  चाहतेही चिंतेत आहेत. इंटरनेटवरील चाहते अभिनेत्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. 
 
Edited by - Priya Dixit    
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सलमान खानची सिकंदर'च्या सेटवर 'किक 2' ची घोषणा

आलिया भट्ट आणि शर्वरी चा अल्फा, YRF चा पहिला महिला-प्रधान स्पाय चित्रपट , २५ डिसेंबर २०२५ ला प्रदर्शित होणार!

Impostor Syndrome आजाराने त्रस्त आहे अनन्या पांडे, या सिंड्रोम बद्दल जाणून घ्या

आयुष्मान खुरानाने भारताच्या पॅरा ऑलिम्पिक स्टार्सना हृदयस्पर्शी कविता समर्पित केली

करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता, जिंकले हे बक्षीस

सर्व पहा

नवीन

तुम्ही दागिने घेत का नाही?

33 वर्षांनंतर पडद्यावर रजनीकांत आणि अमिताभ बच्चन जोडीचा धमाकेदार ट्रेलर वेट्टयान रिलीज

सलमान खानची सिकंदर'च्या सेटवर 'किक 2' ची घोषणा

चंद्रघंटा देवी मंदिर प्रयागराज

बायकोने अर्जेंट पार्सल म्हणून काय ऑर्डर केले ?

पुढील लेख
Show comments