दीपिकाच्या फोटोची खमंग चर्चा

गुरूवार, 12 मार्च 2020 (11:02 IST)
Instagram
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने नुकतेच बिकीनी फोटोशूट केले आहे. एका मासिकासाठी तिने हे बोल्ड फोटोशूट केले असून सोशल मीडियावर त्याचे काही फोटो दीपिकाने पोस्ट केले आहेत. दीपिकाने फोटो पोस्ट केल्यापासून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्‌सचा वर्षाव होत आहे. दीपिकाच्या बिकीनीमधील फोटोंनी सोशल मीडियावरचे तापमान वाढवले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. या फोटोंवर तिचा पती रणवीर सिंगनेही कमेंट केली आहे. 'बेबी, रहम करो यार', असे रणवीरने लिहिले आहे. लग्नानंतर अनेकदा दीपिकाला तिच्या फॅशन सेन्सवरून ट्रोल करण्यात आले.
 
रणवीरसोबत राहण्याचा परिणाम तुझ्यावर झालाय, असे अनेकांनीतिला चिडवले होते. मात्र मासिकासाठी केलेल्या या फोटोशूटनंतर दीपिकावर चांगल्या कमेंट्‌स वर्षाव होत आहे. काहींनी तिच्या बीचवरील फोटोचे मीम्ससुद्धा व्हायरल केले. त्यातला एक मीम दीपिकाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. दीपिकाचा नुकताच 'छपाक' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयाचे कौतुक झाले. ती लवकरच रणवीरसोबत झळकणार आहे. '83' या चित्रपटात रणवीर-दीपिका ऑनस्क्रीनसुद्धा पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. लग्नानंतर ते पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख 'हंगामा -२'चे नवे पोस्टर रिलीज