Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

25 हजार जमा करा; हायकोर्टाचे दीपक तिजोरीला आदेश

Webdunia
शनिवार, 1 जुलै 2023 (07:29 IST)
Twitter
Deposit 25 thousand High Court order  अभिनेता दीपक तिजोरी व निर्माता मोहन नादर यांनी प्रत्येकी 25 हजार रुपये पोलीस कल्याण निधीत जमा करावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. या सुनावणीसाठी दीपक तिजोरी न्यायालयात हजर होते.
 
दीपक तिजोरी यांनी मोहन नादर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी नादर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्या. नितीन साम्बरे व न्या. गौरी गोडसे यांच्या खडंपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. हा गुन्हा रद्द करण्यासाठी माझी काही हरकत नाही, असे तिजोरी यांच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले. तुम्ही पोलीस खात्याचा वापर करुन घेतला आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनीही प्रत्येकी 25 हजार रुपये पोलीस कल्याण निधीत जमा करावेत, असे आदेश देत न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला.
 
दीपक तिजोरी यांनी 15 मार्च 2023 रोजी आयपीसी कलम 406 आणि 420 अंतर्गत नादर यांच्याविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. दीपक तिजोरी यांना पैस मिळण्यासाठी उशीर झाला. म्हणून त्यांनी हा गुन्हा नोंदवला, असा दावा करत नादर यांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने भारताच्या पॅरा ऑलिम्पिक स्टार्सना हृदयस्पर्शी कविता समर्पित केली

Singham Again Trailer:अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'चा ट्रेलर ऑक्टोबरमध्ये या दिवशी रिलीज होणार!

आशा भोसलेंच्या नावाने सुरू आहे फेक टिकटॉक अकाउंट, गायिकेने दिला इशारा

Lata Mangeshkar Birthday : लता मंगेशकरबद्दल 20 रोचक तथ्य

पायल कपाडिया यांच्यासारख्या प्रतिभेचं साक्षीदार होण्याची संधी मिळाल्याचा अभिमान : आयुष्मान खुराना

सर्व पहा

नवीन

बायकोने अर्जेंट पार्सल म्हणून काय ऑर्डर केले ?

गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज,चाहत्यांचे हात जोडून व्यक्त केले आभार

आलिया भट्ट आणि शर्वरी चा अल्फा, YRF चा पहिला महिला-प्रधान स्पाय चित्रपट , २५ डिसेंबर २०२५ ला प्रदर्शित होणार!

ब्रम्हचारिणी मंदिर वाराणसी

Impostor Syndrome आजाराने त्रस्त आहे अनन्या पांडे, या सिंड्रोम बद्दल जाणून घ्या

पुढील लेख
Show comments