Marathi Biodata Maker

धोनीचा सुपरहिरो अवतार, नवीन वेब सिरीज 'अथर्व: द ओरिजिन' चा फर्स्ट लूक बघा

Webdunia
गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (11:40 IST)
भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. अलीकडेच एमएस धोनीने त्याच्या आगामी वेब सीरिजची एक झलक शेअर केली आहे. त्याच्या मालिकेचे नाव अथर्व: द ओरिजिन आहे, ज्यामध्ये तो पूर्णपणे नवीन अवतारात दिसणार आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराने ग्राफिक कादंबरीचा पहिला लूक शेअर केला आहे. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला अगदी नवीन अवतारात पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. चित्रपटाचे लेखन रमेश थमिलमनी यांनी केले असून आदिकलराज आणि अशोक मनोर यांनी निर्मिती केली आहे.
 
महेंद्रसिंग धोनीने सोशल मीडियावर व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून अथर्व या ग्राफिक कादंबरीचा फर्स्ट लूक जारी केला आहे. या ग्राफिक कादंबरीचे शीर्षक अथर्व द ओरिजिन असे आहे. फर्स्ट लूकमध्ये महेंद्रसिंग धोनी रणांगणावर अॅनिमेटेड अवतारात दिसत आहे. यामध्ये त्याचा अवतार राक्षसासारख्या सेनेशी लढत आहे.
 
या ग्राफिक नॉव्हेलची घोषणा 2020 मध्ये करण्यात आली होती. ही मालिका एका नवोदित लेखकाच्या अप्रकाशित पुस्तकावर आधारित आहे. धोनी एंटरटेनमेंटच्या व्यवस्थापकीय संचालक धोनीची पत्नी साक्षी हिने या मालिकेच्या निर्मितीबद्दल सांगितले.
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी नवीन मार्ग शोधत असल्याचे दिसते आणि 'अथर्व' त्यापैकी एक आहे. धोनी आयपीएल (IPL-2022) च्या पुढील हंगामात 4 वेळा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघ गेल्या मोसमातही चॅम्पियन बनला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रणवीर सिंगच्या आगामी ‘धुरंधर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

देसी गर्ल प्रियांका चोप्राने पांढऱ्या लेहेंग्यात आकर्षक शैलीत पोज दिली

राम माधवानी यांच्या आध्यात्मिक अ‍ॅक्शन थ्रिलरमध्ये टायगर श्रॉफ दिसणार वेगळ्या अवतारात

४३ वर्षीय दक्षिणेतील अभिनेत्रीने तिसऱ्यांदा घेतला घटस्फोट

रुबिना दिलीक आणि अभिनव शुक्ला हे पतीची पत्नी और पंगा सीझन 1 चे विजेते ठरले

सर्व पहा

नवीन

अभिनेता आर माधवन मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दिसले; व्हिडिओ व्हायरल

मल्हारी मार्तंड नवरात्र विशेष प्रसिद्ध खंडोबाचे मंदिरे दर्शन

कॅन्सरच्या उपचारादरम्यान दीपिका कक्कर भावुक झाली; म्हणाली- "दररोज मी एका नवीन समस्येशी झुंजत आहे

पंकज त्रिपाठी यांचे 'परफेक्ट फॅमिली' या युट्यूब मालिकेद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

मेक्सिकोची फातिमा बॉश बनली मिस युनिव्हर्स 2025, या प्रश्नाचे उत्तर देऊन जिंकला मुकुट

पुढील लेख
Show comments