rashifal-2026

'पद्मावती'चे भविष्य ठरवण्यासाठी इतिहासतज्ज्ञांची समिती

Webdunia
'पद्मावती' चित्रपटाचं भविष्य ठरवण्यासाठी  इतिहासतज्ज्ञांच्या सहा सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे. पद्मावती हा सिनेमा अंशतः ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याचं सिनेकर्त्यांनी सांगितल्यामुळे केंद्रीय चित्रपट निरीक्षक मंडळाने इतिहासतज्ज्ञ आणि राजघराण्यातील काही व्यक्तींना पद्मावती पाहण्यासाठी निमंत्रित केलं आहे. निर्मात्यांनी 'पद्मावती अंशतः ऐतिहासिक घटनांवर आधारित' असल्याचं सांगून संकट ओढावून घेतल्याचं सेन्सॉर बोर्डाने म्हटलं आहे.
 
पद्मावती चित्रपटातील आशयाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी ही छाननी करावी लागणार असल्याचं बोर्डाने सांगितलं. 'पद्मावती काल्पनिक आहे की ऐतिहासिक घटनांवर आधारित' यासंबंधी विचारणा करणारा फॉर्ममधील भाग रिकामा ठेवल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने सिनेमाची कॉपी निर्मात्यांना परत पाठवली होती.
 
'पद्मावती' 1 डिसेंबर 2017 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी महिनाभर आधी हे रीलिज अनिश्चित काळासाठी पुढे ढकललं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले आज, कोण विजेता होऊ शकतो जाणून घ्या

बिग बॉस 19' चा ग्रँड फिनाले कधी आणि कुठे पाहायचा

Planning a trip after the wedding लग्नानंतर फिरायला जायला देशाबाहेरील ही ठिकाणे सर्वोत्तम

सलमान खानने आमिर खानच्या चित्रपटाची घोषणा शेअर केली

गर्दीत आर्यन खानने केले असे अश्लील कृत्य, पोलिसात तक्रार दाखल

पुढील लेख
Show comments