आर्या परत आली आहे, आणि यावेळी फास आणखी घट्ट कसला जाणार आहे. पहिल्या सीझनच्या शानदार यशानंतर, डिस्ने+ हॉटस्टार, आंतरराष्ट्रीय एमी नामांकित हॉटस्टार स्पेशल, आर्याचा आणखी एक रोमांचक आणि जबरदस्त हंगाम घेऊन येत आहे. या शोचे चाहते बहुप्रतिक्षित सिक्वेलच्या टीझरसाठी खूप उत्सुक होते. याचा टीझर एक प्रभावी आणि वेधक कथानक सादर करते ज्यात आर्या तिच्या पतीच्या हत्येचा बदला घेते. राम माधवानी फिल्म्सकडून पुरस्कार विजेत्या आणि अत्यंत प्रतिभावान राम माधवानी निर्मित, हा टीझर प्रेक्षकांना एक रोमांचक आणि रक्तरंजित शो सादर करणार आहे ज्यामध्ये आर्याच्या दुसऱ्या सीजनमध्ये आर्या सरीनचा प्रवास अधिक कठोर आणि गडद होणार आहे. या टीजरमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन एक भयंकर आणि क्रूर लूकमध्ये दिसत आहे, ती उग्र लाल रंगात माखलेली असून, आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कठोरपणे लढणाऱ्या वाघीणीसारखी दिसत आहे.
दूसऱ्या सीजनविषयी, दिग्दर्शक राम माधवानी म्हणाले की, पहिल्या सीजनसाठी आम्हाला मिळालेले प्रचंड कौतुक आणि प्रेम खूप सुखवणारे होते, यासाठी आम्ही प्रेमपूर्वक आणि संपूर्ण मेहनतीने याचा दूसरा सीजन बनवण्याचा निर्णय घेतला. इंटरनॅशनल एमी अवार्ड्समध्ये बेस्ट ड्रामा श्रेणीमध्ये झालेले या शोचे नॉमिनेशन या कथेवरचा आमचा विश्वास प्रदर्शित करतो, जी ऐकवण्यासाठी आम्ही इथे आहोत. शोच्या चाहत्यांना आर्याच्या प्रवासातील पुढचे पाऊल सादर करण्यासाठी मी उत्साहित आहे. ती प्रत्येक पाऊलावर आव्हानांना सामोरे जाते कारण ती आपल्या परिवाराला जिवंत ठेवणे आणि बदला घेण्यासाठी संतुलन बनवण्यासाठी मजबूर आहे.
दूसऱ्या सीजनमध्ये आर्याचा रोमांचक प्रवास अनुभवा, लवकरच डिज़्नी+ हॉटस्टारवर!