Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इरफानच्या या सवयीमुळे परेशान होते त्याच्या घरचे लोक, वडील म्हणायचे - 'पठाणाच्या घरी ब्राह्मण जन्माला आला ...'

Webdunia
सोमवार, 7 जानेवारी 2019 (14:46 IST)
बॉलीवूड ते हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता इरफान खानने प्रत्येक वर्गाच्या प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. इरफान खानचा आज अर्थात 7 जानेवारीला 52वा बर्थडे सेलीब्रेट करत आहे. इरफानचा जन्म 1967 जयपुराच्या एका मुस्लिम पठाण परिवारात झाला होता. त्याचे पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान आहे. त्याचे वडील टायरचा व्यापार करत होते.  
 
तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की पठाण परिवारात जन्म घेतल्यानंतर देखील इरफान लहानपणापासून शाकाहारी आहे. त्याचे वडील त्याला गमतीनं म्हणायचे की पठाण परिवारात ब्राह्मणाने जन्म घेतला आहे. इरफान खानचा सुरुवातीचा काळ फारच कष्टदायक होता. जेव्हा त्याचा एनएसडीमध्ये प्रवेश झाले, त्याच वेळेस त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता.   
 
त्यानंतर इरफानला घरून पैसे मिळणे बंद झाले. एनएसडीकडून मिळणारी फेलोशिपच्या माध्यमाने त्याने आपला कोर्स पूर्ण केला. इरफान खानने त्याची क्लासमेट सुतपा सिकंदर हिच्याशी 23 फेब्रुवारी 1995 रोजी लग्न केले. इरफानच्या संघर्षच्या दिवसांमध्ये सुतपा नेहमी त्याच्यासोबत उभी होती.  
 
इरफानने जेव्हा सुतपा सिकंदराशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो तिच्यासाठी धर्म परिवर्तन करण्यासाठी देखील तयार झाला होता, पण सुतपाच्या घरचे लोक दोघांच्या लग्नासाठी तयार झाले होते, त्यामुळे इरफानला धर्म बदलण्याचे गरज नाही पडली. इरफान खानने त्याच्या करियरमध्ये बर्‍याज लक्षात ठेवण्यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.   
 
बॉलीवूडसोबत इरफान हॉलिवूडमध्ये देखील सक्रिय  आहे. त्याने 'स्पाइडर मॅन', 'ज्यूरासिक वर्ल्ड' आणि 'इन्फर्नो' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतेच हॉलिवूड   अभिनेता टॉम हॅक्स ने त्याची प्रशंसा करत म्हटले होते की इरफानचे डोळे देखील अभिनय करतात.   
इरफानने पहिल्यांदा 2005मध्ये आलेले चित्रपट 'रोग'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. फिल्म 'हासिल'साठी इरफान खानला त्या वर्षाचे 'बेस्ट विलेन'चा फिल्मफेयर अवॉर्ड मिळाला. त्यानंतर इरफानने 'लंचबॉक्स', 'गुंडे', 'हैदर', 'पीकू' आणि 'हिंदी मीडियम' सारख्या चित्रपटांमध्ये उत्तम दर्जेचे काम केले.  
 
इरफान खानला फिल्म 'पान सिंह तोमर'साठी नॅशनल अवॉर्डाने सन्मानित करण्यात आले होते. वर्ष 2011मध्ये भारत सरकार तर्फे त्याला पद्मश्री ने सन्मानित करण्यात आले. मागच्या वर्षी अर्थात 2018मध्ये इरफानला न्यूरो एंडोक्राइन नावाचा आजार झाला.   
 
त्याच्या उपचारासाठी इरफान बर्‍याच वेळेपासून लंडनमध्ये उपचार घेत आहे. आजारपणामुळे इरफानने एकावर्षापासून एकही चित्रपट केलेले नाही. फिल्म 'हिंदी मीडियम'साठी बेस्ट ऍक्टरचा अवार्ड मिळाला आहे. इरफानच्या दमदार ऍक्टींग आणि शानदार डॉयलॉग डिलिवरीमुळे त्यांचे चाहते त्याची फार आठवण करतात.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

ब्रम्हाजी मंदिर पुष्कर राजस्थान

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

बिग बॉस फेम हिमांशी खुरानाच्या वडिलांना पाच वर्षे जुन्या प्रकरणात अटक

वायलेंट हिरो' चा काळ: ताहिर राज भसीन

पुढील लेख
Show comments