Marathi Biodata Maker

अजय देवगणची ऑनस्क्रीन मुलगी बनली आई, इशिता दत्ताने मुलाला जन्म दिला

Webdunia
गुरूवार, 20 जुलै 2023 (15:02 IST)
Ishita Dutta blessed with a baby boy 'दृश्यम' चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ता आणि तिचा पती वत्सल सेठ एका लाडक्या मुलाचे पालक झाले आहेत. 19 जुलै रोजी अभिनेत्री आई झाली. आई आणि मुलगा दोघेही निरोगी असून अभिनेत्रीला 21 जुलै 2023 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
 
'ETimes' च्या रिपोर्टनुसार, इशिता दत्ताने 19 जुलै 2023 रोजी तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. तेव्हापासून इशिता दत्ता आणि वत्सल सेठ यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
 
इशिता दत्ता तिच्या गरोदरपणात सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. ती चाहत्यांना तिच्या तब्येतीचे अपडेट्स देत असते. याशिवाय इशिताने तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना अनेक फोटोही शेअर केले आहेत. लग्नाच्या 6 वर्षानंतर ही अभिनेत्री आई झाली आहे.
 
इशिता दत्ताने 28 नोव्हेंबर 2017 रोजी वत्सल सेठसोबत लग्न केले होते. दोघांची पहिली भेट 'रिश्तों का सौदागर-बाजीगर' या टीव्ही शोच्या सेटवर झाली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध ४८ वर्षीय अभिनेत्याचे निधन

मुलीच्या जन्मानंतर कियारा अडवाणीची प्रकृती खालावली होती; अभिनेत्री म्हणाली-ती प्रत्येक लहानसहान गोष्टीवरून रडायची

Konkan Tourism निसर्गसौंदर्याने नटलेला प्रदेश कोकण; परिसरातील प्रमुख निसर्गस्थळे

अभिनेत्री तमन्ना भाटिया यांनी बाबा महाकाल यांच्या भस्म आरतीत सहभाग घेतला

अभिनेत्री मौनी रॉयचा संसार मोडला

पुढील लेख
Show comments