Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कबीर सिंग’साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका?

Webdunia
सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 (11:27 IST)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर हा सध्या त्याच्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे शाहिद सध्या प्रमोशन करत आहे. ‘कबीर सिंग’, ‘पद्मावत’, ‘जर्सी’ आणि ‘हैदर’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये शाहिदने काम केले आहे. आता शाहिद एक मोठा प्रोजेक्ट साईन करणार आहे, असे म्हटले जात आहे. या बिग बजेट प्रोजेक्टमध्ये शाहिद हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
 
रिपोर्टनुसार, शाहिद कपूरची ‘ओएमजी-२’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत आगामी बिग बजेट चित्रपटासाठी चर्चा सुरू आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अश्विन वर्दे करणार आहेत. या चित्रपटाशी संबंधित असणा-या एका सूत्राने अशी माहिती दिली आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी शाहिद कपूर आणि अश्विन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे.
 
योजनानुसार गोष्टी पुढे जात आहेत.
शाहिद आणि चित्रपटाचे प्रोड्युसर या प्रकल्पासाठी योग्य दिग्दर्शक शोधत होते, पण अमित राय यांच्याशी चर्चा केल्यानंतर, शाहिद कपूरला वाटले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कथा ते उत्तम पद्धतीने मांडू शकतात. सध्या या चित्रपटासाठी निर्माते टॉप स्टुडिओशी चर्चा करत आहेत जेणेकरून
चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन सुरू होईल.
 
रिपोर्टनुसार, शाहिद कपूरने या ऐतिहासिक चित्रपटामध्ये काम करण्यास होकार दिला आहे, या चित्रपटाचे पेपर वर्क सुरू झाल्यानंतर या चित्रपटाची घोषणा केली जाणार आहे.

Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांना ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Bhadra Maruti : नवसाला पावणारा औरंगाबादचा भद्रा मारुती

रणवीर इलाहाबादिया झाला नॉट रिचेबल, मुंबई पोलिसांच्या संपर्काच्या बाहेर

विशाल ददलानीचा अपघात झाला, कॉन्सर्ट रद्द करावा लागला

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

पुढील लेख
Show comments