Marathi Biodata Maker

Kangana's movie is a superflop कंगनाचा सिनेमा सुपरफ्लॉप

Webdunia
बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (12:44 IST)
Kangana's movie is a superflop मुंबई. बॉलिवूड क्वीन कंगना राणौतचा लोकप्रिय चित्रपट तेजस 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी केली. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर जादू निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. 'तेजस'ने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा खूपच कमी कमाई केली.
 
पहिला वीकेंड ‘तेजस’साठी खूपच निराशाजनक राहिला.  रिपोर्टनुसार, या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी केवळ 1.30 कोटींची कमाई केली आहे. 60 कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट पहिल्या वीकेंडमध्ये 5 कोटींचा आकडाही पार करू शकला नाही, ही कंगनासाठी चिंतेची बाब आहे.
 
रिपोर्टनुसार, असेही बोलले जात आहे की येत्या सोमवारच्या टेस्टमध्ये हा चित्रपट नक्कीच नापास होईल. एकूणच या आकड्यांवर नजर टाकली तर चित्रपटाने सोमवारी 54 लाखांची कमाई केली आहे.
 
रिलीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 1.25 कोटींची कमाई केली. आकडेवारीवर नजर टाकली तर चित्रपटाने दोन दिवसांत केवळ 2.50 कोटींची कमाई केली आहे. आता तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत आणि ते पाहता कंगनाचा 'तेजस' पहिल्या तीन दिवसात 4 कोटींचा आकडाही पार करू शकला नाही.
 
काल कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे. यामुळे लोकांनी तिला   खूप ट्रोल केले आहे. 'धाकड' पेक्षा सरस असूनही कंगनाच्या 'तेजस'ला बॉक्स ऑफिसवर आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी निश्चितच मेहनत घ्यावी लागणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आलिया भट्ट डिजिटल जगाला निरोप देईल? अभिनेत्रीच्या ताज्या विधानामुळे खळबळ उडाली

महेश बाबू यांचा 'वाराणसी' हा चित्रपट या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

Mardaani 3 Review 'मदानी ३' पाहण्यापूर्वी हा रिव्ह्यू नक्की वाचा; धाडसी शिवानी रॉयची सर्वात कमकुवत लढाई?

'धुरंधर' ते देवखेल'... OTT वर या आठवड्यात काय पाहाल? या ५ सिनेमा आणि वेब सिरीज नक्की बघा

अरिजीत सिंह करणार राजकारणात एन्ट्री!

सर्व पहा

नवीन

रणवीर सिंगचा धुरंधर: द रिव्हेंजचा टीझर प्रदर्शित; फक्त ७२ सेकंदात सर्वांनाच थक्क करून टाकले

लग्नापूर्वी जेनेलियाने रितेश देशमुखकडे दुर्लक्ष केले, ९ वर्षे टिकली त्यांची गुप्त प्रेमकहाणी

माळशेज घाटापेक्षाही सुंदर! महाराष्ट्रातील या 'मिनी स्वित्झर्लंड'बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

रोहित शेट्टीने त्याच्या घराबाहेर गोळीबारानंतर सर्व नियोजन रद्द केल्या

27 वर्षांच्या गायिकेचा टॉपलेस लूक व्हायरल

पुढील लेख
Show comments