Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय यांचं रस्ते अपघातात निधन, अवयव दान करणार

Webdunia
सोमवार, 14 जून 2021 (15:29 IST)
राष्ट्रीय पुरस्कार विजेते कन्नड अभिनेते संचारी विजय यांचं बाईक अपघातामध्ये निधन झालं आहे.  ३७ वर्षी विजय यांचा शनिवारी बाईकवरुन प्रवास करताना बंगळुरू जवळ अपघात झाला होता. या अपघातामध्ये विजय यांना गंभीर दुखापत झाली होती. यात त्यांच्या मेंदूला जबरदस्त जखम झाली होती. नंतर उपचारादरम्यान संचारी विजय यांचा मृत्यू झाला. 
 
अपघातानंतर त्यांना त्वरीत एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान ते कोमात केले अन् अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. संचारी विजय यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याच्या मेंदू मृत झाल्याची घोषणा केली, ज्यानंतर विजय यांच्या कुटुंबियांनी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
विजय यांच्या निधनामुळं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 
विजय यांना बाईकवरुन प्रवास करण्याची आवड होती. ते 12 जून रोजी एका मित्राच्या घरून परत येत असताना वाटेत त्यांच्या दुचाकीची अपघात झाला. या अपघातात संचारी यांना गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सलग 48 तास तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे त्यांच्यावर उपचार सुरु होते. संचारी यांना अनेक गंभीर दुखापत झाल्याने त्यांचं शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हतं. त्यानंतर डॉक्टरांनी 14 जूनला अभिनेता ब्रेन डेड घोषित केले.
 
त्याच्या निधनानंतर संचरीच्या कुटुंबियांनी अभिनेत्याच्या शरीराचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. विजयचे चाहते आणि सिनेसृष्टीतील लोक सोशल मीडियावर अभिनेत्याला श्रद्धांजली वाहात आहेत. संचारी विजयच्या छायाचित्रांद्वारे त्यांच्या आठवणी शेअर केल्या जात आहेत. दुसरीकडे काही सोशल मीडिया वापरकर्ते 14 जून ही तारीख अनलकी असल्याचेही पोस्ट करत आहे कारण मागील वर्षी याच तारखेला सुशांतसिंग राजपूत यांनी जगाला निरोप दिला होता.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला आग, मौल्यवान वस्तू जळून खाक

प्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदी मतदान केंद्रावर जाऊनही मतदान करू शकले नाहीत, सोशल मीडिया वर सांगितले

यदाद्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, सर्वात भव्य मंदिर

यामी गौतम आई बनली, एका सुंदर मुलाला जन्म दिला, संस्कृतमध्ये हे विशेष नाव दिले

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

पुढील लेख
Show comments