suvichar

'मणिकर्णिका' च्या सेटवरील काही फोटो व्हायरल

Webdunia
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (10:44 IST)

मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी सिनेमाच्या सेटवरील काही फोटो सध्या सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत आहेत.  या फोटोमध्ये कंगनाने लाल रंगाची साडी नेसली आहे. साडीच्या काठपदरापासून ते दागिन्यांपर्यंत तिचा रॉयल लूक समोर येतो. या सिनेमात झांशीच्या राणीचे शौर्य दाखवण्यात येणार आहे. 

सिनेमात कंगना अनेक साहसी दृश्य करताना दिसणार आहे. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान कंगनाचे अनेक अपघातही झाले आहेत. तलवारबाजीचे दृश्य चित्रीत करत असताना तिच्या डोळ्याजवळ तलवार लागली. यात तिला टाकेही पडले.

यावर्षी १५ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील ब्राह्मण समुहाने ऐतिहासिक तथ्यांसोबत छेडछाड केल्याचा आरोप केला होता. यानंतर सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमात दाखवण्यात आलेल्या कोणत्याही दृश्यामुळे राणी लक्ष्मीबाईची प्रतिमा मलिन होणार नसल्याचे आश्वासन दिले होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

निर्मात्यानं नदीत उडी घेत आयु्ष्य संपवलं; वयाच्या ८५ व्या वर्षी जगाचा निरोप

सलमान खानने त्याच्या चित्रपट निवडीच्या प्रक्रियेबद्दल सांगितले की – मी पटकथा वाचत नाही, मी फक्त ती ऐकतो

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

पुढील लेख
Show comments