rashifal-2026

दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘मोहल्ला अस्सी’ च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

Webdunia
गुरूवार, 11 जानेवारी 2018 (09:37 IST)
सनी देओल आणि साक्षी तंवर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मोहल्ला अस्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सेन्सॉर बोर्डाने चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रमाणित केले आहे. हा चित्रपट काशिनाथ सिंग यांच्या ‘काशी का अस्सी’ या कादंबरीवर आधारित आहे. 

जेव्हा हा चित्रपट ट्रायब्यूनलकडे गेला, तेव्हा त्यामध्ये १० कट्स सुचवण्यात आले होते. त्याचप्रमाणे ‘मंदिर’ आणि ‘शौचालय’ या शब्दांचा उल्लेखदेखील टाळण्यास सांगण्यात आले होते. ट्रायब्यूनलने सुचवलेल्या कट्समुळे चित्रपटाचा २० मिनिटांचा भाग काढून टाकावा लागला असता आणि त्यामुळे कथेचाही सार नष्ट झाला असता, असे निर्मात्यांचे म्हणणे होते. त्यामुळेच निर्मात्यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने ११ डिसेंबर रोजी याप्रकरणी निर्णय दिलेला. पुढील सात दिवसांत चित्रपट प्रमाणित करून प्रदर्शनाची वाट मोकळी करण्याचे आदेश न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला दिले होते. त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या १० कट्सपैकी ९ कट्स न्यायालयाने रद्द केले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

Flashback २०२५ मध्ये या बॉलीवूड अभिनेत्रींनी रेड कार्पेट फॅशनला नव्या अंदाजात सादर केले

बिगबॉस फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात

विनोदी कलाकाराच्या मुलाने जीवन संपवलं

रश्मिका मंदाना अभिनीत 'मायसा' या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित, २०२६ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

मुंबईतील या ठिकाणी नाताळाचा दिवस भव्य साजरा केला जातो; हे प्रसिद्ध चर्च नक्की एक्सप्लोर करा

पुढील लेख
Show comments