Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओम पुरी यांचे हृदयविकाराने निधन

Webdunia
प्रसिद्ध अभिनेता ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते.
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी (66) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी  सकाळी निधन झालं. समांतर सिनेमांपासून ते कमर्शिअल चित्रपटांपर्यंत लीलया अभिनय करत यश मिळवणा-या अभिनेत्यांमध्ये ओम पुरी यांचा समावेश होता. त्यांनी फक्त बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटात काम केले होते. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले आहे. ओम पुरी यांच्या अशा अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीतील दिग्गजांसह चाहत्यांनाही धक्का बसला आहे. अर्धसत्य, मंडी, गांधी, स्पर्श, आक्रोश, भूमिका, घाशीराम कोतवाल अशा अनेक चित्रपट, नाटकांतील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. १८ ऑक्टोबर १९५० साली हरियाणातील अंबाला येथे ओम यांचा जन्म झाला. त्यांनी पंजाबमधील पटियाला येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. १९७६ साली पुण्यातील एफटीआयआयमधील शिक्षणानंतर त्यांनी दीड वर्ष अभिनयाचे धडे दिले. त्यानंतर त्यांनी 'मजमा' हा स्वत:चा थिएटर ग्रुप स्थापन केला. १९९३ साली त्यांनी नंदिता पुरी यांच्याशी लग्न केले, मात्र २०१३ साली ते एकमेकांपासून विभक्त झाले. त्यांच्या पश्चात पत्नी नंदितासह इशान हा मुलगा आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन

पानी'-'मानवत मर्डर्स' नंतर, अदिनाथ कोठारेची नवीन चित्रपटाची घोषणा

अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेता रणवीर सिंह ने आपल्या मुलीचे ठेवले नाव

मिर्झापूर द फिल्म'चा अप्रतिम टीझर रिलीज

Singham Again : सिंघम अगेन'चा 'विनाशम करोहम' टायटल ट्रॅक रिलीज

सर्व पहा

नवीन

शाहरुख खानला कोण धमकावत आहे? , सलमान खाननंतर किंग खानच्या जीवाला धोका

महाराष्ट्र सायबर पोलिसांची ऑनलाइन तिकीट बुकिंग वेबसाइट BookMyShow ला नोटीस, काय आहे संपूर्ण प्रकरण

पार्वती हिल पुणे

Ranbir Kapoor Ramayana :रामायण – भाग १ आणि 2 ची रिलीज तारीख जाहीर

सूरज बडजात्या यांनी अनुपम खेर यांच्या ४० वर्षांच्या कारकीर्दीचा गौरव साजरा करत पत्र लिहिले

पुढील लेख
Show comments