Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साराला धास्तावते एक गोष्ट

Webdunia
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019 (13:37 IST)
'केदारनाथ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आणि हिंदी चित्रपट विश्र्वात पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या मनमिळाऊ स्वभावामुळेही प्रकाशझोतात असते. पदार्पणाच्या चित्रपटातच साराने तिची अशी वेगळी छाप चाहत्यांच्या मनावर उमटवली. ज्यानंतर तिने कायमचविविध कार्यक्रमादरम्यान आपल्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं. एक अभिनेत्री म्हणून सारावरही अपेक्षितपणे माध्यमांच्या सतत नजरा असतात. याविषयीच तिने आता तिचं मत उघड केलं आहे. सहसा अनेकदा माध्यमांच्या नजरा आपला वारंवार पाठलाग करत असल्याचं पाहून सेलिब्रिटी नाराजी व्यकत करतात, माध्यमांना टाळतातही. पण, सारा मात्र याला बर्याचदा अपवाद ठरते. जीम म्हणू नका, किंवा एखाद्या ठिकाणाला भेट देणं म्हणू नका. साराला पाहिल्यावर जेव्हा मध्यमांचे प्रतिनिधी, विशेषतः छायाचित्रकार तिच्याभोवती गर्‍हाडा घालतात. तेव्हा तीसुद्धा त्यांना आनंदी चेहर्याने भेटते. याच बाबतीत तिने एक अत्यंत महत्त्वाचा दृष्टीकोन सर्वांसमोर  ठेवला आहे. 'मिस मालिनी' या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत तिने एक अत्यंत महत्त्वाची बाब सांगितली. 'छायाचित्रकार तुमचा एक फोटो टीपण्यासाठी उभे असतात ही एक बाजू.
 
आता याच्याच विरुद्ध विचार करुन पाहा. म्हणजे तुम्ही जीममधून बाहेर येता. तिथे सात छायाचित्रकार उभे आहेत. पण, ते तुमच्या फोटोच काढत नाही आहेत. किंवा, 20 माणसं तिथे आहेत. पण, ते तुमच्यासोबत सेल्फीही काढत नाहीत. आता जेव्हा ते छायाचित्रकार तुमचा फोटोच काढच नाहीत तेव्हा ही बाब धास्तावणारी असते. ज्याविषयी साहाजिकच चिंता वाटू लागते. तुमच्यासाठीही बाब अडचणीचीही ठरु शकते.', असं सारा म्हणाली. जवळपास एक वर्षाहून अधिक काळ या चित्रपटसृष्टीत व्यतीत केल्यानंतर अगदी थोड्या वेळात इतकी प्रसिद्धी, आपलेपणा मिळणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं असल्याचं सांगत याची तुलना दुसर्या कोणत्याच गोष्टीशी होऊ शकत नसल्याचं मतही तिने मांडलं. माध्यमांशी असणारं हेच सुरेख नातं अगदी शिताफीने   हाताळण्याच्या याच गुणामुळेही सारा सर्वांचच आवडीची अभिनेत्री ठरत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

रणवीर इलाहाबादियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; यूट्यूब चॅनेल्सवर पसरणाऱ्या अश्लीलतेबद्दल सरकार काय करत आहे?

प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर

नीमराणा किल्ला पॅलेस अलवर राजस्थान

छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक

एकता कपूरच्या वकिलाने बजावली नोटीस, 100 कोटींच्या मानहानीची चर्चा

पुढील लेख
Show comments