Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रियंका चोप्राने ‘बेवाच’चे नवीन पोस्टर प्रसिद्ध केले

Webdunia
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016 (09:08 IST)
अदाकारा प्रियंका चोप्राने आपल्या हॉलीवुड डेब्यूचे हैलोवीन स्पेशल पोस्टर प्रसिद्ध केले आहे. प्रियंकाने पोस्टर  ट्विटरच्या माध्यमाने प्रसिद्ध केले आहे. या पोस्टरमध्ये प्रियंका चोप्रा वटवाघळाच्या रूपात पाहायला मिळत आहे.  
 
"मी तुम्हाला पाहते आहे. बू वॉच बी बॅड, बेवॉच मूव्ही, सर्वांना हॅपी हॅलोवीन", असं ट्विट करून प्रियंकानं चाहत्यांना आगामी हॉलिवूडपटाची झलक दाखवली आहे. या पोस्टरमध्ये 34 वर्षांच्या प्रियंकानं ब्लॅक वन शोल्डर आणि हाय स्लिट गाऊन परिधान केलं आहे.
 
बेवॉच या हॉलिवूडपटात प्रियंकासोबत झॅक एफ्रॉन, ड्वेन जॉन्सन, एलेक्झांड्रा डॅडारिओ, जॉन बॉस दिसणार आहेत. या हॉलिवूडपटाचं मुख्य पोस्टर जुलैमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्या पोस्टरमध्ये या हॉलिवूडपटातील सर्व पात्रांना दाखवण्यात आलं होतं. 
 
पुढच्या वर्षी 19 मे रोजी हा हॉलिवूडपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र प्रियंकानं ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या पोस्टरमुळे तिच्या आगामी हॉलिवूडपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Sara Ali Khan : सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात!

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments