Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Puneeth Rajkumar: पुनीत कुमार यांना मरणोत्तर 'कर्नाटक रत्न' देण्यात आले

Puneeth Rajkumar: पुनीत कुमार यांना मरणोत्तर 'कर्नाटक रत्न' देण्यात आले
, मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (23:21 IST)
दिवंगत कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांना मरणोत्तर कर्नाटकचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'कर्नाटक रत्न' प्रदान करण्यात आला. मंगळवारी आयोजित 67 व्या कन्नड राज्योत्सव (राज्य स्थापना दिन) निमित्त अभिनेत्याचा सन्मान करण्यात आला. पुनीत हे  या प्रतिष्ठित सन्मानाचा 9वा प्राप्तकर्ता आहेत . या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुनीत राजकुमार यांना कर्नाटक रत्न देऊन सन्मानित केले. 
 
सिनेअभिनेते रजनीकांत आणि ज्युनियर एनटीआर आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती या समारंभाला पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिवंगत अभिनेत्याच्या वतीने त्यांची पत्नी अश्विनी पुनीत राजकुमार यांनी त्यांचे  भाऊ अभिनेता शिवराजकुमार आणि इतर कुटुंबीयांच्या उपस्थितीत कर्नाटक रत्न पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमात विजय प्रकाश यांच्यासह अनेक प्रसिद्ध गायकांनी आपले सादरीकरण दिले.

Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करंट दुसऱ्या वायर मध्ये आहे