rashifal-2026

राधिकाने केले पुन्हा बोल्ड फोटोशूट

Webdunia
शनिवार, 29 एप्रिल 2017 (08:24 IST)
बॉलीवूडची हॉट अभिनेत्री राधिका आपटे नेहमी बोल्ड आणि सेक्सी अंदाजामुळे चर्चेत असते. यंदाही ती बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. या फोटोशूटचे खास वौशिष्ट्य म्हणजे, राधिकाने हे फोटोशूट कोणत्या स्टुडिओत न करता स्वत:च्या घरातच केले आहे. तिच्या या फोटोशूटमधील काही फोटो तिने इंस्ट्राग्रामवर शेअर केले आहेत. राधिका नेहमीच बोल्डपणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने 'पाच्र्ड' या चित्रपटात निभावलेल्या भूमिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली असून राधिकाने आतापर्यंत रजनीकांत, ऐश्‍वर्या रॉय-बच्चन, दीपिका पदुकोण आणि सोनाक्षी सिन्हा आदी दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. राधिकाने रजनीकांतसोबतचा अनुभव शेअर केला आहे. ती म्हणते की, खंर सांगायचं झालं, तर आम्हा दोघांनाही कधी मध्यस्थीची गरज लागली नाही. कबालीचे दिग्दर्शक रंजित यांनी मला चित्रपटात काम करणार का, अशी विचारणा केली असता मी क्षणाचाही विचार न करता होकार कळवला, कारण या चित्रपटात मला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत काम करायला मिळणार होते. तसेच ते माझे आवडते कलाकार असून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला सोडायची नव्हती. राधिकाने या चित्रपटात रजनीकांत यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
सर्व पहा

नक्की वाचा

सुभेदार' मालिकेत बबली दीदीच्या भूमिकेत मोना सिंगचा नवा अवतार

'तुंबाड २' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री; 'हस्तर'च्या रहस्यमय जगात साकारणार महत्त्वाची भूमिका!

या चित्रपटांमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकत्र दिसणार

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानिमित्त भारताच्या २३ शहरांमध्ये मिठाई वाटण्यात आली

राजपाल यादवने सुरु केला नवीन यूट्यूब चैनल

सर्व पहा

नवीन

लग्नाच्या रिसेप्शनमध्ये रश्मिका मंदाना लाल साडीत दिसली, तर विजय देवरकोंडा पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसला देखणा

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची ४७ लाखांची फसवणूक; निर्माता अविनाश जाधवांविरुद्ध गुन्हा दाखल

Vijay Crishna देवदासचे हिटलर बाबूजींचा जगाला निरोप, विजय कृष्ण यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले

मी न्यायालयात रडलो नाही, सोशल मीडियावरील बातम्यांवर विश्वास ठेवू नका असे राजपाल यादव म्हणाले

संत तुकाराम महाराज मंदिर श्री तीर्थक्षेत्र देहू

पुढील लेख