पुन्हा घडणार रामायण

शुक्रवार, 27 मार्च 2020 (12:00 IST)
रस्ते ओस पडले असताना दूरदर्शनने 90 च्या दशकात प्रसारित झालेल्या रामायण मालिकेला पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. 28 मार्चला सकाळी 9 वाजता या मालिकेचा पहिला भाग पुन्हा एकदा प्रसारित करण्यात येणार आहे. आणि दुसरा रात्री 9 वाजता प्रसारित करण्यात येईल.
 
90 च्या दशकात रामायण मालिकेची प्रेक्षकांवर अशी जादू होती की मालिकेचं प्रसारण होत असताना अक्षरशः रस्ते ओस पडायचे. लोक घरात बसून ऐतिहासिक मालिका पाहयचे आणि आपोआप सर्वींकडे लॉकडाउनची स्थिती असायची आणि रस्त्यावर जणू फर्क्यूच असायचा. त्यामुळे ही मालिका पुन्हा एकदा पाहण्यासाठी लोक घरात बसतील अशी कल्पना करत हा निर्णय घेतला गेला आहे.
 
माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रामायण मालिकेच्या पुन: प्रसारणावर आनंद व्यक्त केला आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत