Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रभू राम बनण्यासाठी रणबीर कपूर दारू आणि मांसाहार सोडणार

Ranbir Kapoor
Webdunia
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023 (16:31 IST)
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचे नाव आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सामील आहे. तो कोणत्याही कॅरेक्टरमध्ये बसतो. रोमँटिक असो वा अॅक्शन, रणबीर कपूर प्रत्येक पात्रात त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो. आता तो त्याच्या आगामी 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये अभिनेता भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे.
 
रामायण चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी करत आहेत. या चित्रपटात रणबीरसोबत आलिया भट माता सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी आधी आली होती. पण तिच्या व्यस्त शेड्युलमुळे अभिनेत्रीने या प्रोजेक्टमधून माघार घेतली. तर रणबीर आता व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सर्व प्रकारचा त्याग करण्यास तयार आहे.
 
सूत्रांप्रमाणे रामायणात प्रभू रामाची भूमिका साकारण्यासाठी तो त्याच्यांसारखा धर्मनिष्ठ होईल. या चित्रपटासाठी अभिनेता नॉनव्हेज आणि दारू घेणे बंद करणार आहे. रिपोर्टनुसार चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल तोपर्यंत तर रणबीर दारू आणि मांसाहारापासून पूर्णपणे दूर झालेला असेल.
 
वृत्तानुसार, रणबीर कपूरने स्वतः ठरवले आहे की तो या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होईपर्यंत मांसाहार किंवा दारू घेणार नाही. सोशल मीडियावर अनेक चाहते रणबीरच्या या निर्णयाचे कौतुक करत आहेत. रणबीर कपूरही ट्विटरवर ट्रेंड करत आहे.
 
हा चित्रपट पुढील वर्षी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या तरी निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. रणबीर कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता लवकरच त्याच्या आगामी 'अॅनिमल' चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये तो रश्मिका मंदान्नासोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगणच्या 'रेड 2' चा टीझर प्रदर्शित,आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार

तारक मेहता मध्ये अखेर दयाबेन परत येतीये?

‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे

सनी देओलचा 'लाहोर 1947' या वर्षी प्रदर्शित होणार

अक्षय कुमारच्या केसरी 2 चा टीझर प्रदर्शित, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी दाखवली जाणार

सर्व पहा

नवीन

तारक मेहता मध्ये अखेर दयाबेन परत येतीये?

सैफअलीखान हल्ल्याच्या प्रकरणाला नवे वळण, आरोपीने मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला

अजय देवगणच्या 'रेड 2' चा टीझर प्रदर्शित,आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

रेसिपी आणि मजेशीर कंमेंट्स

पुढील लेख
Show comments