Festival Posters

शाहरुख खान आणि काजोल यांची लंडनच्या ऐतिहासिक लेस्टर स्क्वेअरमध्ये अमर प्रतिमेनंतर प्रतिक्रिया

Webdunia
शुक्रवार, 5 डिसेंबर 2025 (14:21 IST)
यश राज फिल्म्सच्या ऐतिहासिक ब्लॉकबस्टर दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ( डीडीएलजे  ) च्या 30 वर्षांच्या निमित्ताने काल शाहरुख खान आणि काजोल यांनी लंडनच्या प्रतिष्ठित लेस्टर स्क्वेअरमध्ये राज आणि सिमरन यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. हा सन्मान अभूतपूर्व आहे कारण हा लेस्टर स्क्वेअरमध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. हा पुतळा आता हॅरी पॉटर, मेरी पॉपिन्स, पॅडिंग्टन, सिंगिन’ इन द रेन, बॅटमॅन आणि वंडर वुमन यांसारख्या जागतिक सांस्कृतिक आयकॉनसोबत उभा आहे.
 
कांस्य पुतळा  डीडीएलजे  मधील त्या अमर दृश्याचे प्रतिनिधित्व करतो ज्यात राज आणि सिमरन आपला आयकॉनिक पोज देताना दिसतात—दक्षिण आशियाई प्रेक्षकांच्या पिढ्यानुपिढ्या वर प्रभाव टाकणारा क्षण.
 
अनावरणावेळी भावना व्यक्त करताना शाहरुख खान म्हणाले, “खरं सांगायचं तर कल्पना च नव्हती की  डीडीएलजे  एवढं phenomenon बनेल! अशा सिनेमाचा भाग होणं माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आम्हा कुणालाच कल्पना नव्हती की हा चित्रपट लोकांच्या हृदयात एवढी मोठी जागा निर्माण करेल. आदित्य चोप्रा आणि टीमला हा चित्रपट चांगला आहे याचा विश्वास असला तरी त्याच्या या जागतिक ओळखीची कल्पना कुणी केली नव्हती.”
 
लंडनमधील डीडीएलजे च्या पुतळ्याचे महत्त्व सांगताना SRK म्हणाले, “हे आमच्यासाठी (काजोल आणि माझ्यासाठी) आणि भारतीय चित्रपट उद्योगासाठी खूप वैयक्तिक आहे. यूके, विशेषतः लंडन, आमच्या स्टारडमचा मोठा टप्पा होता. त्या काळी परदेशातील सर्वात मोठा बाजार यूके होता.  डीडीएलजे  चे शूटिंग 30–40 दिवसांत मजेत झाले—स्वित्झर्लंड आणि इंग्लंडमध्ये जलद आणि मुक्त पद्धतीने. लेस्टर स्क्वेअरमध्ये तर आम्ही कुणाला न सांगता पटकन एक सीन शूट करून निघालो! भारतीय सिनेमासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.”
 
काजोल म्हणाल्या, “30 वर्षे झाली आणि आम्ही अभिमानाने सांगू शकतो की डीडीएलजे हा जगातील सर्वाधिक काळ चालणारा चित्रपट आहे. तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवला गेला आहे. त्याचा भाग असणं रोमांचक आहे. आम्ही कधीच विचार केला नव्हता की  डीडीएलजे भारतीय आणि दक्षिण आशियाई समुदायांसाठी जागतिक प्रतीक बनेल.”
 
यूकेसह जगभरातील भारतीय आणि दक्षिण आशियाई प्रेक्षकांसाठी हा पुतळा किती महत्त्वाचा आहे हे सांगताना काजोल पुढे म्हणाल्या, “यूकेमध्ये राहणाऱ्या किंवा येथे येणाऱ्या भारतीयांसाठी हा पुतळा त्यांच्या आठवणींना नव्याने स्पर्श करणारा ठरेल. त्यांच्या मनात घराची भावना जागी करेल. मला आशा आहे की लेस्टर स्क्वेअरमध्ये हा पुतळा पाहताना प्रेक्षकांना एक वेगळीच जिव्हाळ्याची भावना मिळेल.”
 
डीडीएलजे ही राज आणि सिमरनची कथा सांगते—दोन एनआरआय जे युरोप आणि भारतातील प्रवासात प्रेमात पडतात, ज्याची सुरुवात किंग्स क्रॉस स्टेशनवरून होते. लेस्टर स्क्वेअर हे स्थान त्या दृश्याशी थेट जोडलेले आहे जिथे राज आणि सिमरन एकमेकांना पहिल्यांदा भेटतात, जरी त्यांना तेव्हा याची जाणीव नसते.
 
1995 मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर  डीडीएलजे  जागतिक सांस्कृतिक फिनोमेनन बनला आणि आजही भारतात त्याचा विक्रमी थिएटर रन सुरू आहे. माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही भारत भेटीदरम्यान त्याचा उल्लेख केला होता. मॅंचेस्टरमध्ये यावर्षी  कम फॉल इन लव – द डीडीएलजे म्यूजिकल हा स्टेज म्युझिकलही प्रदर्शित झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

सलमान खानच्या जबरदस्त लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला, वाढदिवसाच्या महिन्याची सुरुवात स्टाईलने झाली

Christmas 2025 नाताळ स्पेशल भेट देण्यासाठी भारतातील टॉप पर्यटन स्थळे

अनुष्का शंकर एअर इंडियावर नाराज, सितार विमान प्रवासादरम्यान तुटली

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी 'मोहब्बतें' साठी फक्त एक रुपया मानधन घेतले कारण.....

तिसरा NIDFF चित्रपट महोत्सव गुवाहाटी येथे होणार; १५ देशांतील १६२ चित्रपट सहभागी होतील

पुढील लेख
Show comments