Dharma Sangrah

आर. के. स्टुडिओ विकणार, कपूर कुटुंबीयांचा निर्णय

Webdunia
सोमवार, 27 ऑगस्ट 2018 (08:53 IST)
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांचा साक्षीदार राहिलेला आर. के. स्टुडिओ कपूर कुटुंबीयांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला आहे. स्टुडिओतून मिळणारे उत्पन्न तुलनेने कमी असून त्याच्या देखभालीसाठी होणारा खर्च जास्त असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. ऋषी कपूर यांनी या बातमीला दुजोरा दिला. शो मॅन राज कपूर यांनी या स्टुडिओची स्थापना केली होती. 
 
आर.के. स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीनंतर स्टुडिओचे आणि त्यात संग्रहीत केलेल्या स्मृतींचेही मोठे नुकसान झाले. आता तो पुन्हा उभा करणे शक्य नाही. आता हा स्टुडिओ विकणे योग्य ठरेल असा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात या स्टुडिओच्या स्टेज नंबर १ वर 'सुपर डान्सर' या डान्स रिअ‍ॅलिटी शोचा सेट उभारण्यात आला होता. या सेटवर शॉर्ट सर्किटमुळे  आग लागली होती. आधी सेटवरच्या पडद्यांनी पेट घेतला आणि मग संपूर्ण स्टेज जळून खाक झाला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण ही थंड हवेची ठिकाणे कौटुंबिक सहलींसाठी उत्तम

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीने जुळ्या मुलांना जन्म दिला

पुढील लेख
Show comments