Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तनुश्री दत्तावर 25 कोटींचा मानहानीचा दावा

तनुश्री दत्तावर 25 कोटींचा मानहानीचा दावा
, शुक्रवार, 13 मार्च 2020 (15:03 IST)
अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘नाम’ स्वयंसेवी संस्थेनं अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात 25 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. 
 
#MeToo चळवळी दरम्यान तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याचबरोबर तनुश्रीनं नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या नावावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचे ही आरोप केले होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार केला असून संस्थेच्या नावाने परदेशातून कोट्यावधींच्या देणग्या घेतल्या, असे आरोप तनुश्रीनं केले होते.
 
संस्थेचा हा पैसा कुठे जातो ? गरीब विधवांना वर्षातून एकदा साड्या वाटून फोटो काढायचं हे यांचं काम. तसेच कोल्हापूर पूरग्रस्तांना 500 घरं देणार असल्याचे म्हटले होते, त्याचं काय झालं? असे प्रश्न तनुश्रीने विचारले होते.
 
या आरोपानंतर ‘नाम’ संस्थेनं तनुश्रीविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. मात्र, या खटल्याच्या सुनावणीवेळी तनुश्री अनुपस्थित होती. संस्थेने उच्च 
 
न्यायालयात याचिका दाखल केली. यात तनुश्री दत्ताने एका पत्रकार परिषदेत त्यांच्या संस्थेवर आरोप केले. त्यामुळे संस्थेच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे. असे सांगण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘सूर्यवंशी’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली