suvichar

‘सैराट’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकचं पोस्टर लाँच

Webdunia
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या ‘सैराट’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. शशांक खैतान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून सिनेमाचं नाव ‘धडक’ असेल.
 
श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर ‘आर्ची’च्या तर शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर ‘परशा’च्या भूमिकेत दिसणार आहे. करण जोहर, झी स्टुडिओ, हिरु यश जोहर, अपूर्वा मेहता यांची निर्मिती असून डिसेंबरमध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. ‘धडक’ 6 जुलै 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
करण जोहरने ट्वीट करुन सिनेमाचं पोस्टर लाँच केलं आहे.हा चित्रपट 18 वर्षांच्या जान्हवीचा डेब्यू आहे. 22 वर्षीय इशान मात्र माजिद माजिदी यांच्या ‘बियाँड द क्लाऊड्स’मध्ये झळकला होता. तर उडता पंजाबमध्येही त्याने लहानशी भूमिका साकारली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

मराठवाड्याचे वैभव संत ज्ञानेश्वर उद्यान पैठण

विलक्षण, धाडसी आणि वेड लावणारा, 'बंदर'चा ट्रेलर प्रदर्शित

जास्मिन सँडलसच्या डेहराडून कॉन्सर्टमध्ये अपघात, बॅरिकेड कोसळल्याने गोंधळ

Pune Joke मोटरसायकल कुठय

नसीरुद्दीन शाह म्हणाले-त्यांचे मुलं पहाटे ३ वाजता उठवतात आणि माझा वाईट अभिनय दाखवतात

पुढील लेख
Show comments