Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सलमानची शेजाऱ्या विरोधात तक्रार, मानहानीचा खटला दाखल केला

Webdunia
शनिवार, 15 जानेवारी 2022 (12:20 IST)
अभिनेता सलमान खानच्या वतीने त्याच्या शेजाऱ्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी मुंबई शहर दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी कोणताही अंतरिम आदेश देण्यास नकार दिला. सलमान खानने दिवाणी दावा दाखल केला आहे. मुंबईजवळील पनवेल येथील त्याच्या फार्महाऊसजवळील जमिनीच्या भूखंडाचा मालक केतन कक्कर याने एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्याच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.
 
सुनावणीदरम्यान न्यायाधीश अनिल एच लड्ढा यांनी कक्कर यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 21 जानेवारीची तारीख निश्चित केली आहे. खानचे प्रतिनिधीत्व करणार्‍या वकिलांनी खटल्याच्या प्रलंबित कालावधीत कक्कर यांना पुढील विधाने करण्यापासून रोखण्यासाठी अंतरिम आदेशाची मागणी केली. कक्करचे वकील आभा सिंग आणि आदित्य प्रताप यांनी मात्र या विनंतीला विरोध केला की, त्यांना या खटल्याची कागदपत्रे गुरुवारी संध्याकाळीच मिळाली आणि ती संपूर्णपणे बघितली गेली नाहीत.
 
अॅडव्होकेट सिंग म्हणाले की, कोणतीही घाई नाही आणि सलमान खानने खटला दाखल करण्यासाठी महिनाभर वाट पाहिली तर कक्करलाही उत्तर दाखल करण्यासाठी थोडा वेळ मिळायला हवा. त्यानंतर न्यायाधीशांनी सुनावणी तहकूब केली. मुंबईतील वांद्रे उपनगरात राहणाऱ्या सलमान खानचे रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे फार्महाऊस आहे. मूळचे मुंबईतील कक्कर यांचा खान यांच्या फार्महाऊसशेजारी एका टेकडीवर प्लॉट आहे. खानच्या दाव्यानुसार, कक्करने यूट्यूबरशी बोलताना अभिनेत्याविरुद्ध खोटी टिप्पणी केली. शोमध्ये सहभागी झालेल्या इतर दोन व्यक्तींनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.
 
खान यांनी YouTube, सोशल मीडिया साइट्स जसे की फेसबुक, ट्विटर आणि सर्च इंजिन गुगल यांनाही खटल्यात पक्षकार बनवले आहे आणि त्यांना त्यांच्या वेबसाइट्सवरून "अपमानास्पद सामग्री" ब्लॉक आणि काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे. खान यांनी कक्कड यांच्याबद्दल किंवा त्यांच्या फार्महाऊसबद्दल अपमानास्पद सामग्री पोस्ट किंवा प्रकाशित करण्यापासून रोखण्यासाठी स्थायी आदेश मागितला आहे.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments