Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 4 April 2025
webdunia

सना फातिमा शेख अभिनेत्रीने स्वत: ला केले क्वारंटाइन

sana fatima shaikh
, मंगळवार, 30 मार्च 2021 (08:49 IST)
‘दंगल’ अभिनेत्री सना फातिमा शेख देखील कोरोना झाला आहे. अभिनेत्रीने स्वत: ही माहिती दिली आहे. सनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केले आहे ज्यात तिने सांगितले की तिची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यानंतर अभिनेत्रीने घरी स्वत: ला क्वारंटाइन केले आहे. अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये  सांगितले की, ती पूर्ण काळजी घेत आहे आणि सर्व प्रोटोकॉल फॉलो करत आहे. अभिनेत्रीनेे  सर्वांचे प्रेम आणि प्रार्थनेबद्दल आभार मानले.
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘दंगल’मध्ये सनाच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यानंतर आमिर खान देखील घरी क्वारंटाइन आहे आणि त्याने आपल्या संपूर्ण स्टाफला डिस्चार्जही दिला आहे.
 
काही दिवसात कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटी कोरोनाच्या कचाट्यात अडकले आहेत. दरम्यान, त्यापैकी काही जणांची तब्येत सुधारली आहे. रणबीर कपूरप्रमाणेच संजय लीला भन्साळीची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली पण आता दोघेही बरे झाले आहेत. या व्यतिरिक्त कार्तिक आर्यन, आर माधवन, परेश रावल, मिलिंद सोमण, रमेश तिवानी, सतीश कौशिक, दक्षिण भारतीय अभिनेत्री बिग बॉस 14 फेम निक्की तांबोळी यांच्यासह अनेक नामांकित तारे कोरोना विषाणूच्या कचाट्यात अडकले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिनेता अंकित मोहन साकारणार 'बाबू' शेठ