देशात करोनाचं संकट उद्रेक होत असून बॉलिवूडमध्ये देखील संसर्ग वाढत असताना दिसत आहे. आता अभिनेते आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे खासदार परेश रावल यांना करोनाची लागण झाल्याचं समोरं आलं आहे.
परेश रावल यांनी ट्विट करत करोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. “दूर्दैवाने माझा कोव्हि़ड 19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अशात गेल्या 10 दिवसात माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी कृपया करोना टेस्ट करावी.” असं ट्विट परेश रावल यांनी केलं आहे.
लसीकरण सुरु असूनही धोका वाढत असल्यामुळे परिस्थिती हातबाहेर जात असताना दिसत आहे. दरम्यान 9 मार्चला परेश रावल यांनी करोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. त्यावेळी देखील त्यांनी ट्विट करत याची माहिती दिली होती. काळजीची बाब म्हणजे लस घेऊन 18 दिवसांनंतर परेश रावल यांना करोना संसर्गाची लागण झाली.
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार जसं कार्तिक आर्यन, आमिर खान, आर माधवन तसचं मिलिंद सोमण यांना करोनाची लागण झाली आहे.