Publish Date: Thu, 25 Mar 2021 (11:50 IST)
Updated Date: Thu, 25 Mar 2021 (11:05 IST)
भारतीय जनता पक्षावर सातत्याने टीका करणाऱ्या स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
मला उद्याच्या भविष्याविषयी कल्पना नाही, पण देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, असा अंदाज कुणाल कामरा यांनी व्यक्त करत त्यांच्यावर टीका केली आहे.
कुणालने ट्विट करत फडणवीस यांच्याबाबत हे वक्तव्य केलं. "मृत्यूनंतर आपल्यासोबत काय होतं, माहीत नाही. भविष्यात वेळ ही संकल्पना कशा पद्धतीने वापरल जाईल, याची मला खात्री नाही. उद्याचा दिवस खरंच उजाडेल किंवा नाही, याबाबतही माहिती नाही. पण देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीच होणार नाहीत, याची मला खात्री वाटते," असं कामरा यांनी म्हटलंय.