Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यातही होळी आणि रंगपंचमी खेळण्यास मनाई

पुण्यातही होळी आणि रंगपंचमी खेळण्यास मनाई
, बुधवार, 24 मार्च 2021 (20:36 IST)
पुणे जिल्ह्यातही होळी आणि रंगपंचमी खेळण्यास मनाई  करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी तशी माहिती दिली आहे. मुंबईप्रमाणेच  पुण्यातही कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढू लागला आहे. होळी आणि रंगपंचमीला लोकांनी एकत्र आल्यास कोरोनाचा प्रसार आणखी वाढण्याचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
हॉटेल परिसर, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक-खाजगी मोकळ्या जागा, गृहनिर्माण संस्थामधील मोकळ्या जागा, रिसॉर्ट अशाप्रकारच्या कोणत्याही ठिकाणी होळी आणि धुलिवंदन साजरे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चिंताजनक : कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे राज्यात