Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

मिलिंद सोमणला कोरोनाची लागण

Milind Soman Corona Positive
, शुक्रवार, 26 मार्च 2021 (12:12 IST)
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांन करोनाची लागण होताना दिसत येत आहे. बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण यांना करोनाची लागण झाली आहे. स्वतः मिलिंद यांनी एक पोस्ट शेअर करत यासंबंधीची माहिती दिली.
 
मिलिंद सोमण यांनी ट्विट करत म्हटले की 'करोना टेस्ट पॉझिटीव्ह... क्वारन्टाइन' मिलिंद यांच्या आधीही अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली आहे. नुकतेच आमिर खान, आर माधवन, रणबीर कपूर, मनोज वाजपेयी, कार्तिक आर्यन, सिद्धांत चतुर्वेदी, तारा सुतारिया आणि सतीश कौशिक यांसारखे अनेक कलाकार कोविड पॉझिटिव्ह आले आहेत.
 
यापूर्वी अनेक कलाकार यातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे अनेक चित्रपटांचे शूटिंग मधेच थांबवावे लागत असून सध्याची परिस्थिती बघता सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यायला उशीर झाला