Dharma Sangrah

जबरा फॅन, संजू बाबाच्या नावावर केली कोट्यावधीची संपत्ती

Webdunia
बुधवार, 7 मार्च 2018 (16:33 IST)
अभिनेता संजय दत्तच्या एका चाहतीने चक्क कोट्यवधी रूपयांची संपत्ती संजय दत्तच्या नावावर केली आहे.  निशी हरिश्चंद्र त्रिपाठी असे या चाहतीचे नाव आहे. निशी त्रिपाठीने मृत्यूपूर्वी आपली सर्व संपत्ती (बॅंक अकाऊंट्स, सर्व पैसा आणि बॅंकेतील लॉकरही) संजय दत्तच्या नावे केली आहे. धक्कादायक असे की, या सर्व प्रकाराची अभिनेता संजय दत्त याला कोणतीच कल्पना नव्हती.
 

तिच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीबाबत जेव्हा खुलासा पुढे आला तेव्हा तिच्या कुटुंबियांनाही धक्का बसला. सदर प्रकरण आर्थिक आणि बॅंकेशी संबंधीत असल्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. 

दरम्यान, अभिनेता संजय दत्तचे वकील सुभाष जाधव यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधीत संपत्तीतील काहीही आपणास नको आहे.  निशी त्रिपाठी यांचे १५ जानेवरी २०१८ला प्रदीर्घ अजाराने निधन झाले. ती आपली ८० वर्षी आई, मुले अरूण, आशीष आणि मुलगी मधुसोबत राहात होती. या कुटुंबाकडे १० कोटी  रूपयांहून अधिक किमतीचा ३ बीएचकेचा फ्लॅट मलबार हिल येथे आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

धुरंधर'चा 20 व्या दिवशी 600 कोटी क्लबमध्ये प्रवेश

हिवाळ्यातील रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य पाहण्यासाठी दक्षिण भारतातील या शांत ठिकाणी नक्कीच भेट द्या

Flashback २०२५ मध्ये या बॉलीवूड अभिनेत्रींनी रेड कार्पेट फॅशनला नव्या अंदाजात सादर केले

बिगबॉस फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात

विनोदी कलाकाराच्या मुलाने जीवन संपवलं

पुढील लेख
Show comments