suvichar

संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची जोडी पुन्हा दिसणार

Webdunia
गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 (09:44 IST)
अभिनेता संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची धमाकेदार जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अर्शद वारसी याने त्याचा आगमी चित्रपट ‘पागलपंती’च्या प्रमोशनवेळी याबाबत माहिती दिली. “संजू आणि मी पुढीलवर्षी येणाऱ्या एका चित्रपटात एकत्र काम करणार आहोत. प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद-फरहाद या चित्रपटाचे दिग्दर्शक करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. परंतु या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित केलेली नाही.” अशी माहिती अर्शदने दिली.
 
या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगताना अर्शद असे म्हणाला की, “आमच्या पुढच्या चित्रपटात संजू एका अंध डॉनची भूमिका साकारत आहे. आणि त्याचा सहकारी आहे. विशेष म्हणजे संजूच्या अंधपणाबद्दल केवळ मलाच माहिती आहे. संपूर्ण चित्रपटात संजू माझ्या डोळ्यांनी जग पाहताना दिसेल. या चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी आम्ही लवकरच युरोपमधील बुडापेस्ट येथे जाणार आहोत.”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

'रामायण'मधील रामाने अयोध्येत मोठी गुंतवणूक केली, रणबीर कपूरने कोट्यवधी रुपयांचा भूखंड खरेदी केला

दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 'द स्किन डॉक्टर' यांना अटक केली; संजय कपूर यांच्या मृत्यूशी जोडले आहे प्रकरण

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची लेक अडकली लग्नबंधनात

दिलजीत दोसांझच्या मॅनेजरच्या घरावर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियावर जबाबदारी स्वीकारली

Weekend Trip दोन दिवसात फिरता येतील असे महाराष्ट्रातील रमणीय ठिकाणे

पुढील लेख
Show comments