Marathi Biodata Maker

सपनाचे देशी 'ठुमके'

Webdunia
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019 (11:57 IST)
सपना चौधरी ही गायन आणि नृत्यात धमाल उडवून दिल्यानंतर आता चित्रपटात धमाकेदार एंट्री करण्यासाठी सज्ज  झाली आहे. तिचा पहिला चित्रपट 'दोस्ती के साईड इफेक्टस्‌'चे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. यू-ट्यूबवर या चित्रपटाचे ट्रेलर पाहता आपल्या देशी ठुमक्यांतून चाहत्यांवर राज्य करणारी सपना चौधरी आता मोठ्या पडद्यावरही राज्य करण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येते. दोस्ती के साइड इफेक्टस्‌मध्ये मैत्री, कटकारस्थान आणि संघर्ष यांचा समावेश आहे. ट्रेलरच्या प्रारंभीच सपना ही एक कॉलेज विद्यार्थिनीच्या रूपातून दिसते. चित्रपटाच्या टीझरमध्ये सपना ही आपल्या चार मित्राच्या गोष्टी घेऊन आल्याचे दाखविले आहे. हे मित्र आयुष्यात काहीतरी करून दाखवण्यासाठी धडपड करत असतात. मात्र, प्रत्यक्षात वेगळेच घडते आणि त्यांच्या आयुष्यालावळण मिळते. यादरम्यान त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. हा चित्रपट चालू महिन्यातच प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाले आहे. त्यात नेहीप्रमाणे ती नृत्य करताना दाखविले आहे. या गीताचे बोल 'ट्रिंग ट्रिंग' आहे. हे गीत अनिया सय्यदने म्हटले आहे तर संगीत अल्ताफ सय्यद आणि मैनी वर्माने दिले आहे. सपना चौधरीने आपल्या दिलकश अदाकारीने आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. मात्र, या चित्रपटातून ती वेगळ्याच भूमिकेतून समोर येत आहे. श्रोत्यांना देखील हे गाणे बर्‍यापैकी आवडले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

इमरान हाश्मी शूटिंग दरम्यान जखमी; हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल

गलतेश्वर महादेव मंदिर सुरत

Year Ender 2025: 2025 मध्ये हे सेलिब्रिटी पालक झाले

क्यूंकी सास भी कभी बहू थी 2: तुळशी मिहिरपासून वेगळी झाली, नवीन जीवन सुरू केले

धुरंधर'मधील 'शरारत' गाण्यासाठी तमन्ना भाटियाची पहिली पसंती होती, आदित्य धरने तिला का नाकारले?

पुढील लेख
Show comments