suvichar

शूटिंगदरम्यान शिव ठाकरे जखमी

Webdunia
सोमवार, 3 जुलै 2023 (14:42 IST)
Shiv Thackeray injured सध्या दक्षिण आफ्रिकेत 'खतरों के खिलाडी 13' या बहुचर्चित कार्यक्रमाचं  शूटिंग सुरू आहे. या कार्यक्रमात मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. पण प्रसारण होण्यापूर्वीच कार्यक्रमातील अनेक स्पर्धक स्टंट करताना जखमी झाले आहेत. 
 
शिव ठाकरेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये शिवच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झालेली दिसत आहे. तसेच त्याच्या हाताच्या बोटाला टाकेदेखील पडले आहेत. शिव नेहमीच लढवय्या म्हणून ओळखला जातो. त्यामुळे चाहते त्याच्या व्हिडीओवर कमेंट्स करत त्याला 'योद्धा' म्हणत आहेत. 
 
'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान स्टंट करताना अनेत स्पर्धक जखमी झाले आहेत. नायरा बॅनर्जी, रोहित रॉय, अरिजित तनेजा, ऐश्वर्या शर्मा या कलाकारांचा यात समावेश आहे. रोहित शेट्टी हा कार्यक्रम होस्ट करणार आहे.
 
'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमातील स्पर्धक स्टंटबाजी करताना दिसून येतात. दरम्यान त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. आता 15 जुलैपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीवर रात्री 9 वाजता प्रेक्षक हा कार्यक्रम पाहू शकतात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

जास्मिन सँडलसच्या डेहराडून कॉन्सर्टमध्ये अपघात, बॅरिकेड कोसळल्याने गोंधळ

Pune Joke मोटरसायकल कुठय

नसीरुद्दीन शाह म्हणाले-त्यांचे मुलं पहाटे ३ वाजता उठवतात आणि माझा वाईट अभिनय दाखवतात

Chincholi Morachi महाराष्ट्रातील असे ठिकाण जिथे तुम्हाला घडेल असंख्य मोरांचे दर्शन; मोराची चिंचोली पुणे

आर. माधवन यांनी एका बनावट जाहिरातीविरोधात आवाज उठवला; ''सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत ते म्हणाले..."

पुढील लेख
Show comments