Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रद्धाची लोकप्रियता आता साता समुद्रापार

webdunia
गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (19:06 IST)
भय आणि विनोद यांचे अफलातून समीकरण असलेला ‘स्त्री' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारश्रती यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची लोकप्रियता केवळ देशापुरतीच मर्यादित राहिली नसून आता हा चित्रपट चक्क जपानच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. श्रद्धा कपूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ‘स्त्री सगळ्यावर विजय मिळवण्यासाठी सज्ज. आज जपानमध्ये प्रदर्शित होणार', असे कॅप्शन श्रद्धाने या पोस्टला दिल्याचे पाहायला मिळाले.

त्यामुळे हा चित्रपट आता जपानमध्ये प्रदर्शित झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, ‘स्त्री' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. या चित्रपटातले ‘मिलेगी मिलेगी' हे गाणे विशेष गाजले. स्त्रीमुळे श्रद्धाच्या लोकप्रितेत तुफान वाढ झाली आहे. यापूर्वी श्रद्धा ‘आशिकी 2', ‘एक व्हिलन', ‘हैदर', ‘बागी', ‘रॉक ऑन 2', ‘हसीना पारकर', ‘ओके जानू', ‘हाफ गर्लफ्रेंड' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

दिलदार बाहुबली! जीम ट्रेनरला दिली मोठी भेट