Dharma Sangrah

विवाहबंधनात अडकले गायक अरमान मलिक, लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड आशना श्रॉफ सोबत घेतले सप्तपदी

Webdunia
गुरूवार, 2 जानेवारी 2025 (18:27 IST)
Bollywood News: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरमान मलिक लॉन्ग टाइम गर्लफ्रेंडआशना श्रॉफसोबत विवाहबंधनात अडकले आहे. अरमानने 2023 मध्ये त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असलेल्या आशनाशी साखरपुडा केला होता. तसेच अरमान मलिकने त्याच्या लग्नाचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
 
तसेच अरमान आणि आशना यांच्या आयुष्यातील नवीन प्रवासाची सुरुवात केल्याबद्दल चाहते आणि सेलिब्रिटीज त्यांचे अभिनंदन करत आहे. अरमान मलिक आणि आशना श्रॉफ खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. 2017 मध्ये दोघांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण, काही अडचणींमुळे दोघेही वेगळे झाले. यानंतर, 2019 मध्ये अरमान आणि आशना पुन्हा एकदा भेटले आणि तेव्हापासून ते एकत्र आहे. आशना पती अरमानपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. तसेच आशना व्यवसायाने YouTuber, ब्लॉगर, सोशल मीडिया सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाते. ती फॅशन आणि सौंदर्याशी संबंधित ब्लॉग तयार करते.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुभेदार' मालिकेत बबली दीदीच्या भूमिकेत मोना सिंगचा नवा अवतार

'तुंबाड २' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री; 'हस्तर'च्या रहस्यमय जगात साकारणार महत्त्वाची भूमिका!

या चित्रपटांमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकत्र दिसणार

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानिमित्त भारताच्या २३ शहरांमध्ये मिठाई वाटण्यात आली

राजपाल यादवने सुरु केला नवीन यूट्यूब चैनल

सर्व पहा

नवीन

सारांश' मधील वृद्ध वडिलांपासून ते 'तन्वी द ग्रेट' च्या दिग्दर्शकापर्यंत, अनुपम खेर यांचा ५०० हून अधिक चित्रपटांमधील प्रवास असा आहे

इन्दूरमध्ये हास्याचा धमाका! सानंद ट्रस्टतर्फे प्रशांत दामले यांचे 'शिकायला गेलो एक' नाटकाचे पाच प्रयोग

अनिल कपूरच्या 'सुभेदार'ने आंतरराष्ट्रीय खळबळ उडवली, न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर त्याची जादू दाखवली

Dhurandhar 2 Trailer Release: लियारीचा राजा कोण बनणार? धुरंधर २ चा ट्रेलर प्रदर्शित, रणवीर अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसला

'Tateeree' गाण्यावरून बादशाह अडचणीत; एफआयआर दाखल, महिला आयोगानेही समन्स बजावले

पुढील लेख
Show comments