Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मला मूल नकोच’, गायिका नेहा भसिन असे का म्हणाली?

Neha Bhasin
Webdunia
गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (15:04 IST)
मुंबई : ‘कुछ खास है जिंदगी’ हे गाणं आजही अनेकांच्या आठवणीत असेल. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फॅशन’ चित्रपटातील हे गाणं चांगलंच गाजलं होत. हे गाणं गाजल्याने गायिका नेहा भसीनला देखील ओळख मिळाली. वयाच्या १८ व्या वर्षी रिऍलिटी शो मध्ये सहभागी झालेल्या नेहाने ‘बिग बॉस १५’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. आपल्या उत्तम गाण्यांमुळे नेहा तशी चर्चेचा कायम भाग असते. नुकतेच एका मुलाखतीत केलेल्या भाष्यामुळे ती आता चर्चेत आली आहे. ‘आई होण्याचे माझे कधीच स्वप्न नव्हते’, असे नेहाने म्हटले आहे. नेहाने असं नक्की का म्हटलं? नक्की काय झालंय असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत.
 
गायिका असलेल्या नेहा भसीनची नुकतीच एक मुलाखत झाली. त्यात नेहाला तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक समीर उद्दीन यांसोबत ६ वर्षांपूर्वी नेहाचे लग्न झाले होते. मात्र त्या दोघांनी अद्याप बाळाचा विचार केला नाही यावर तिला विचारण्यात आल्यावर नेहा म्हणाली, मला वाटतं आयुष्यात मी कधीच आई होणार नाही. कारण ते माझे स्वप्न कधीच नव्हतं. मला एक अनाथ आश्रम बनवायचा आहे. जिथे मला १०-१२ मुलांची काळजी घेता येईल. त्यांना चांगले शिक्षण देईन. त्यांना त्याच्या आयुष्यात हवं असलेलं प्रेम देईन. मी कधी विचारच केला नाही की माझी स्वतःची मुलं असतील. त्यामुळे मला स्वतःचं मूल नकोच आहे. पण अनाथ मुलांसाठी माझ्या मनात कायमच प्रेम आहे. बालपणापासूनच मला वाटायचं की मी अनाथ मुलांना दत्तक घ्यावं. पण नंतर मला जाणवलं की एक मूल दत्तक घेण्यापेक्षा मी जास्त काहीतरी करू शकते. पुढच्या दोन-तीन वर्षांत मी यावर काम करणार आहे.
 
आईवडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांची काळजी घेतली गेली पाहिजे. यात आपलं योगदान असायला हवं असं मला वाटत. म्हणून मी कधीच आई होण्याचं स्वप्न पाहिलेलं नाही किंवा मला माझं मूल हवं असंही नाही. पण अनाथ मुलांसाठी माझ्या मनात नेहमीच प्रेम आहे. आगामी दोन-तीन वर्षांमध्ये मी त्यावर काम सुरू करणार आहे.” असं नेहा म्हणाली. बिग बॉस ओटीटी आणि बिग बॉस १५ ची स्पर्धक म्हणून नेहा भसीन समोर आली होती. हिंदीसह अनेक भाषांमध्ये तिने गाणे गायले आहेत. तर वयाच्या १८ व्या वर्षी ती ‘कोक व्ही पॉपस्टार’ या रिऍलिटी शोमध्ये ती सहभागी झाली होती. तो शो देखील तिने जिंकला होता.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्टेजवर ढसाढसा रडली नेहा कक्कर, चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया

अक्षय कुमारच्या केसरी 2 चा टीझर प्रदर्शित, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी दाखवली जाणार

इमरान हाश्मीची पत्नी परवीन त्याला तिच्यासाठी अनलकी मानते, कारण जाणून घ्या

कंगना राणौतला तिचे वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, ती बनली बॉलिवूडची क्वीन

चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यन महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित

सर्व पहा

नवीन

सनी देओलचा 'लाहोर 1947' या वर्षी प्रदर्शित होणार

श्रीकृष्ण रुक्मिणीचा इथे दिव्य विवाह झाला, माधवपूर बीच गुजरात

प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या लाईव्ह शो दरम्यान दगडफेक

अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा मुंबई नागपूर महामार्गावर भीषण अपघात

स्टेजवर ढसाढसा रडली नेहा कक्कर, चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments