Publish Date: Wed, 09 Jan 2019 (16:27 IST)
Updated Date: Wed, 09 Jan 2019 (15:30 IST)
मागील वर्ष बॉलिवूडमध्ये लग्नसराईचे वर्ष होते. आता 2019 वर्षात देखील बरीच लग्न व अफेयरच्या चर्चा ऐकायला मिळू शकतात. सध्या बॉलिवूडमधील काही जोड्या आपल्या रोमँटिक लाईफबद्दल चर्चेत आहेत. खर्या आयुष्यात रोमांस करणार्या कलाकारांच्या यादीत आता सोनाक्षी सिन्हाच्या नावाचा देखील समावेश झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सोनाक्षी सध्या नवोदित अभिनेता जहीर इक्बालसोबत रोमांस करते आहे. जहीर सलमान खान फिल्म प्रोडक्शनच्या नोटबुकमधून यावर्षी 2019मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमात मोनीष बहलची मुलगी प्रनूतन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाक्षी व जहीर सलमानमुळे एकमेकांना भेटले. अद्याप ते दोघे लोकांसोर एकत्र आलेले नाहीत. सोनाक्षी आधी बंटी सचदेवासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण याचवर्षी फ्रेब्रुवारीत दोघांचेही ब्रेकअप झाले. खरे तर दोघांचेही रिलेशन लग्नापर्यंत पोहोचणार असे मानले जात होते. पण अचानक त्यांच्या ब्रेकअपची खबर आली. बंटीनंतर सोनाच्या आयुष्यात जहीरने एन्ट्री घेतली आहे. या वर्षात नव्या जोड्यांमध्ये यांचा देखील समावेश असेल असे बोलले जात आहे.