Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुभाष घई यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Webdunia
रविवार, 8 डिसेंबर 2024 (11:56 IST)
प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक सुभाष घई यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनाचा त्रास, अशक्तपणा आणि वारंवार चक्कर येत असल्याने 79 वर्षीय सुभाष घई यांना आयसीयूमध्ये नेण्यात आले.
 
डॉक्टरांच्या पथकाच्या बारीक निरीक्षणाखाली आहेत. सुभाष घई यांची प्रकृती सुधारण्याची चिन्हे दिसत असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी स्क्रीनला सांगितले. सूत्राने सांगितले की, घई यांना एका दिवसात आयसीयूमधून सामान्य वॉर्डात हलवले जाण्याची शक्यता आहे.ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.चाहतेही त्यांच्या आवडत्या दिग्दर्शकासाठी प्रार्थना करत आहेत.

सुभाष घई हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते आहेत. जगात त्यांच्या चाहत्यांची कमी नाही. आता सुभाष घई यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर कमेंट करायला सुरुवात केली. अशा परिस्थितीत आता सुभाष घई यांच्या कुटुंबीयांच्या जवळच्या व्यक्तीने काळजी करण्यासारखे काही नाही असे म्हटले आहे.

वार्षिक तपासणीसाठी त्यांना  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र त्यानंतरही त्याचे चाहते खूप चिंतेत आहेत. कारण सुभाष घई 79 वर्षांचे झाले आहेत आणि सुभाष घई यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा ही चिंतेची बाब बनली होती, परंतु आता सुभाष घई बरे आहेत आणि त्यांच्या चाहत्यांनी या बातमीने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
 
राज कपूर यांच्यानंतर त्यांना इंडस्ट्रीतील दुसरे 'शो मॅन' म्हटले जाते. सुभाष यांनी त्यांच्या यशस्वी चित्रपट कारकिर्दीत सुमारे 16 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, त्यापैकी 13 बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत.
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हैदराबादमध्ये पुष्पा 2 च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, चित्रपटाच्या वेडाने घेतला महिलेचा जीव

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 द रुलने पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

Bhagam Bhag 2:गोविंदा शिवाय 'भागम भाग 2' बनणार,अभिनेत्याचा मोठा खुलासा

अमेय पटनायकची भूमिका करून अजय देवगण पुन्हा प्रभावित करणार, रेड 2 ची रिलीज डेट जाहीर

सुनील पाल झाले अचानक बेपत्ता, 24 तासात सापडला कॉमेडियन

सर्व पहा

नवीन

कॉमेडी किंग' कपिल शर्माला 'ग्लोबल एंटरटेनर ऑफ द इयर' पुरस्कार

Christmas 2024: सांताक्लॉजचे गाव लॅपलँड

दीपिका पदुकोण दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचली

Pushpa 2: 'पुष्पा 2' पाहण्याच्या घाईत जीव गमवावा लागला, रुळ ओलांडताना 19 वर्षीय तरुणाला रेल्वेची धडक

मल्हारी मार्तंड खंडोबाची जेजुरी

पुढील लेख
Show comments