Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Suhana Khan: शाहरुखची लेक सुहाना खान आता अभिनया सोबतच शेती करणार!

Webdunia
शुक्रवार, 23 जून 2023 (13:37 IST)
शाहरुख खानची लाडकी सुहाना खान खूप चर्चेत असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सुहाना स्टारकिड्समध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि प्रत्येकजण तिच्या ग्लॅमरस लुकचे चाहते आहे. ती लवकरच झोया अख्तरच्या द आर्चीजमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर आणि अगस्त्य नंदाही दिसणार आहेत. सुहाना खानने अलिबागच्या थाल गावात करोडो रुपयांचे शेत विकत घेतले आहे. 
 
सुहाना खानने शेतजमिनीच्या नोंदणीच्या कागदपत्रांमध्ये स्वतःला शेतकरी असल्याचे सांगितले आहे. सुहाना खानच्या या निर्णयामुळे तिला काय करायचे आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.जमिनीची किंमत 12 कोटी 91 लाख रुपये आहे. 
 
या दीड एकर जागेवर 2218 चौरस फूट बांधकामही करण्यात आले आहे. या जमिनीचा व्यवहार 1 जून रोजी झाला असून त्यासाठी सुहानाने 77 लाख46 हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. सुहाना खानने ही जमीन तीन बहिणींकडून (अंजली, रेखा आणि प्रिया) विकत घेतली आहे. त्या बहिणींना त्यांच्या आई-वडिलांकडून ती जमीन वारसाहक्काने मिळाली आहे. 
 
सुहाना खानने शेत विकत घेण्यापूर्वी शाहरुख खाननेही अलिबागमध्ये एक आलिशान बंगला बांधला आहे. किंग खानचा अलिबागमध्ये समुद्रकिनारी एक बंगला आहे, ज्यामध्ये स्विमिंग पूल आणि हेलिपॅडही आहे. अभिनेत्याने त्याचा 52 वा वाढदिवसही अलिबागमध्ये साजरा केला.
 
सुहाना खानचा द आर्चीज OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आलेली नसली तरी, या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर यांसारख्या स्टार किड्सनाही पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
 







Edited by - Priya Dixit  
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, लीलावती रुग्णालयात दाखल

अक्षय कुमारने 'भूत बांगला'च्या सेटवर तब्बूचे केले स्वागत, 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा ही जोडी दिसणार एकत्र

हृतिक रोशनच्या 'कहो ना प्यार है' चित्रपटाला बॉलिवूडमध्ये झाले 25 वर्षे पूर्ण

कार्तिक आर्यनला 10 वर्षांनंतर अभियांत्रिकीची पदवी मिळाली

भूल भुलैया 2 नंतर तब्बू या हॉरर चित्रपटातून प्रेक्षकांना घाबरवणार

सर्व पहा

नवीन

सैफ अली खान हेल्थ अपडेट समोर आली, रुग्णालयातून कधी डिस्चार्ज मिळणार डॉक्टरांनी सांगितले

Attack on Saif Ali Khan : पोलिसांनी करीनासह 30 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले

श्री सद्गुरु शंकर महाराज पुणे

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली

एकेकाळी घरोघरी भटकावे लागले होते, आज आहे सर्वात प्रसिद्ध गीतकार

पुढील लेख
Show comments