Publish Date: Mon, 01 Oct 2018 (17:21 IST)
Updated Date: Mon, 01 Oct 2018 (17:23 IST)
पडीक आणि इम्रान हाश्मी सोबत किसिंग सीन, प्रणय दृश्यामुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता ने पुन्हा गंभीर आरोप केले आहे. या आगोदर जेष्ठ अभिनेते अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तनुश्री दत्तने आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तनुश्री हिने राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची पाहिजे होती पण त्यांना मिळाली नाही म्हणून त्या प्रसंगात त्यांनी तोडफोड केली आहे असा गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरे यांच्यावर राजकीय टीका झाल्याने या प्रकरणाला आता वेगळं वळण आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनीच माझी कार फोडली असून मनसेच्या कार्यकर्त्यांशी हाताशी धरून आपल्याला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे असा तिने आरोप केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची मिळाली नाही म्हणून ते चिडले असून, राज ठाकरे आणि नाना पाटेकर यांनी एकत्र येऊन मला त्रास दिला असून त्यांनी मला छळले आहे. तर जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर हा चिंधी अभिनेता असल्याची टीकाही तिने केली. मुंबईत झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे, नाना पाटेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आता मनसे काय करते या कडे सर्वांचे लक्ष आहे.