Dharma Sangrah

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका दोघांनी सोडली, दिसणार नवे चेहेरे

Webdunia
बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (11:23 IST)
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील 12 वर्षांपासून भाग असलेली अभिनेत्री नेहा मेहता अर्थात 'अंजली भाभी' हा शो सोडत आहे. काही दिवसांपूर्वी याच मालिकेतील 'रोशन सिंह सोढी' ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या गुरुचरण सिंह यांनी शो सोडला. 
 
नेहा मेहता 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो दुसऱ्या प्रोजेक्टसाठी सोडत असल्याची माहिती आहे. तसंच नेहा मेहताच्या जागी अभिनेत्री सुनैना फौजदार 'अंजली भाभी'ची भूमिका साकारणार  आहे.  पुढील एपिसोडमध्ये'अंजली भाभी'च्या भूमिकेत दिसणाऱ्या सुनैनाने संतान, लेफ्ट राईट लेफ्ट, लागी तुझसे लगन, कुबूल है, एक रिश्ता साझेदारी का, बेलन वाली बहू यांसारख्या शोमध्ये काम केलं आहे. 
 
दुसरीकडे 'रोशन सिंह सोढी' ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या गुरुचरण सिंहनेही शो सोडल्यानंतर आता त्या जागी अभिनेता बलविंदर सिंह सुरी 'सोढी'ची भूमिका साकारणार आहे. बलविंदर सिंह सुरीने दिल तो पागल है, धमाल, साजन चले ससुराल, लोफर यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

पेड्डी'च्या प्रमोशनदरम्यान गर्दीचा गोंधळ मुळे रामचरणच्या हाताला दुखापत

डॉन ३' सोडल्यानंतर रणवीर सिंगवर एफडब्ल्यूआयसीईने बंदी घातली

ऐतिहासिक भव्यता आणि सौंदर्याने नटलेला; समुद्रात उभा अलिबागच्या 'अष्टागराचा राजा' कुलाबा किल्ला

रणवीर सिंगचा 'डॉन ३' सोडण्याचा निर्णय महागात पडला; फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर FWICE ने बंदी घातली

पुढील लेख
Show comments