Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बॉलिवू़डची चंदेरी दुनियेला लागले आहे आत्महत्येचे ग्रहण या सर्वांनी संपवले आयुष्य

Webdunia
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (14:45 IST)
बॉलिवू़डची चंदेरी दुनिया बऱ्याच कलाकारांसाठी त्यांचं आयुष्य बदलणारी ठरली आहे. बॉलीवूडचं जग बाहेरून कितीही लखलखतं असलं तरी या क्षेत्रात बराच अंधार आहे. सिनेसृष्टीशी संबंधित कलाकार तणावामुळे निराश होऊन आयुष्य संपवण्यासारखं चुकीचं पाऊल उचलतात. बॉलिवू़डमधील अशाच काही कलाकारांनी नैराश्यामुळे स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. त्याचा हा एक रिपोर्ट जो मनोरंजन क्षेत्रातील पैसा अपयश दाखवतो
 
१) जिया खान -
'निशब्द' व 'गजीनी' चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने खूप कमी वेळात प्रेक्षकांची मनं जिंकली होती. जुहू येथील राहत्या घरी तिने गळफास लावून आत्महत्या केली. वैयक्तिक आयुष्यातील तणाव आणि नैराश्य तिच्या मत्यूचं कारण होतं. जियाच्या मृत्यूवरून विविध तर्क वितर्कही करण्यात आले होते.
 
२) दिव्या भारती
- ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री दिव्या भारतीची आत्महत्या अजूनही रहस्यचं आहे. वयाच्या १९ व्या वर्षी दिव्याचा मृत्यू झाला. पण तिचा मृत्यू खिडकीतून पाय घसरून झाला कि तिनं स्वत:हून खिडकीतून उडी मारली याचा उलगडा अजूनही झाला नसून तिचा मृत्यू आत्महत्या होता कि अपघात हे अस्पष्टच आहे.
 
३) गुरूदत्त -
 अभिनेते गुरूदत्त यांना त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत पाहण्यात आलं. मेडिकल रिपोर्टनुसार रक्तात झोपेच्या गोळ्याचं व मद्याचं प्रमाण जास्त आढळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा सांगण्यात आलं. तसंच वैवाहिक आयुष्याला कंटाळून गुरूदत्त यांनी आत्महत्या केली असण्याचा दावा करण्यात येत होता.
 
 ४. सिल्क स्मिता
- दक्षिण भारतीय सिनेमा गाजवलेली अभिनेत्री म्हणून सिल्क स्मिताचा उल्लेख होतो. आपल्या राहत्या घरी सिल्क स्मिताने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात चित्रपटातून येत असलेल्या अपयशातून आत्मह्त्या करत असल्याचं तिने लिहिलं होतं.
 
 ५. परवीन बाबी - २००५ साली परवीन यांचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला. काही दिवस दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर परवीन घरात मृतावस्थेत आढळल्या. परवीन यांना डायबिटिसचा त्रास होता. त्याचप्रमाणे आयुष्यातील एकटेपणा कायमचा संपवण्यासाठी परवीन यांनी आत्महत्या केल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला होता.
 
६. सिद्धार्थ बेदी
 कबीर बेदी यांनी त्यांचा मुलगा सिद्धार्थ याने १९९७ साली केलेल्या आत्महत्येबद्दल खुलासा केला आहे. आत्मचरित्र लिहिताना यश आणि अपयश याविषयी मांडताना कबीर बेदी यांना आयुष्यातील सर्वात दुखड दिवस नजरेसमोर आला आणि त्यांनी त्यांच्या मुलाच्या समस्येबद्दल आणि त्याने झेललेल्या त्रासाबद्दल वक्तव्य केलं आहे. सिद्धार्थ हा कबीर यांचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा होता. त्याला स्किझोफ्रेनिया झाल्याचे समोर आले होते. १९९७ मध्ये जेव्हा त्याने आत्महत्या केली तेव्हा तो २६ वर्षांचा होता.
 
७. अभिनेत्री तुनिषा शर्मा 20 वर्षांची होती, जिने फार कमी वेळात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. अली बाबा: दास्तान-ए-काबुल स्टार तुनिषा शर्माने 24 डिसेंबर रोजी आत्महत्या केली. शोच्या सेटवर तिने गळफास लावून घेतला, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी तुनिषाचा माजी प्रियकर शीजान खान याला अटक केली आहे. अभिनेत्रीच्या आईने शीजानवर तुनिशाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलीस अजूनही शीजनची चौकशी करत आहेत.
 
८.अभिनेत्री वैशाली टक्कर हिने इंदूरमधील तेजाजी नगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 'ससुराल सिमर का' मधील अंजली भारद्वाजच्या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध होती. ही घटना 16 ऑक्टोबर 2022 रोजी घडली. अभिनेत्रीच्या आत्महत्येजवळ एक सुसाईड नोटही सापडली होती. त्या चिठ्ठीवरून असे समजले की, ती तिचा शेजारी राहूल नवलानीवर नाराज होती. राहूलला तिला अडीच वर्षे मानसिक छळ केल्याबद्दल शिक्षा व्हावी, अशी इच्छा तिने सुसाईड नोटमध्ये लिहिली होती.
 
९. बंगाली अभिनेत्री पल्लवी डे हिने 15 मे 2022 रोजी आत्महत्या केली. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कोलकाता येथील फ्लॅटमध्ये अभिनेत्रीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. कायदेशीर प्रक्रियेसाठी मृतदेह एमआर बांगूर रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालात जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. तसेच त्याच्या फ्लॅटमधून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. अभिनेत्रीने असे पाऊल का उचलले याचा खुलासा अद्याप झालेला नाही.
 
१०.अभिनेत्री बिदिशा डी मुझुमदार हिनेही आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी तिने पल्लवी डे यांच्या निधनाबद्दल शोकही व्यक्त केला होता. धक्कादायक बाब म्हणजे बिदिशा दे मुझुमदार यांनी बुधवारी 25 मे 2022 रोजी पल्लवीच्या मृत्यूच्या शोकानंतर 10 दिवसांनी आत्महत्या केली.
११. मंजुषा नियोगी -
 
कांची अभिनेत्री मंजुषा नियोगी हिने 27 मे 2022 रोजी आत्महत्या केली. कोलकाता येथील राहत्या घरी ती लटकलेल्या अवस्थेत आढळली. मंजुषा आपल्या कुटुंबासह कोलकात्यातील पाटुली भागात राहत होती. मॉडेलच्या आईने दावा केला की तिची जवळची मैत्रीण बिदिशा डी मजुमदारच्या मृत्यूनंतर ती तीव्र नैराश्याने ग्रस्त होती.
 
१२. रश्मिरेखा ओझा -
लोकप्रिय ओडिया अभिनेत्री रश्मिरेखा ओझा भुवनेश्वरमध्ये तिच्या भाड्याच्या घरात लटकलेल्या अवस्थेत सापडली होती. अभिनत्रीच्या वडिलांनी तिच्या मुलीच्या मृत्यूमागे तिचा लिव्ह-इन पार्टनर संतोष पात्रा असल्याचा आरोप केला होता. तथापि, अभिनेत्रीने सुसाईड नोटमध्ये तिच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचं म्हटलं होतं.
 
१३.‘काय पो छे’या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत झळकलेला अभिनेता आसिफ बसराने आत्महत्या केली आहे.
 
१४.अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा देशातील तमाम तरुणींचा लाडका अभिनेता होता. 14 जून 2020ला सुशांतनं राहत्या घरी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. सुशांतच्या मृत्यूचा तपास सुरूवातीला मुंबई पोलीस करत होते. यात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचं नावं देखील पुढे आलं होतं.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

वायलेंट हिरो' चा काळ: ताहिर राज भसीन

जमिनीवर बसून चहा प्यायले, हातात झेंडा घेऊन चालले, Bageshwar Baba यांच्या यात्रेत Sanjay Dutt यांचा नवीन अवतार

चंदिगडमध्ये गायक आणि रॅपर बादशाहच्या नाईट क्लबवर बॉम्ब हल्ला

स्वातंत्र्यसंग्रामाचा साक्षीदार झाशीचा किल्ला

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

पुढील लेख
Show comments