बॉलिवूड अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबातील इतर सहा जणांच्या मृत्यूप्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयाने आरोपी परवेझ टोक याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. परवेझ टोक हा लैला खानचा सावत्र पिता होता आणि त्याला तिला दुबईला नेऊन चुकीचे काम करायला लावायचे होते. हे तिला मान्य नसताना त्याने कुटुंबातील सहा जणांची हत्या केली.
गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपट अभिनेत्री लैला खान खून खटला न्यायालयात सुरू होता आणि नुकताच मुंबई सत्र न्यायालयाने त्यावरचा निर्णय राखून ठेवला होता. आज मुंबईच्या सत्र न्यायालयाने आरोपी परवेझ टाक याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
अभिनेत्री लैला खानचे खरे नाव रेश्मा पटेल असून तिच्या आईचे नाव सेलिना पटेल होते सेलिनाने तीन लग्न केले होते. लैला ही सेलिना आणि नादीर शाह पटेल यांची मुलगी होती.
लैला खान ने 2008 मध्ये राजेश खन्ना अभिनित चित्रपट वफा: अ डेडली लव्ह स्टोरी मध्ये काम केले मात्र या चित्रपटाला फारसा फायदा झाला नाही.
लैला ने बी आणि सी ग्रेड चित्रपटात काम केले. मुंबईत तिने बॉलिवूड मध्ये काम मिळवण्यासाठी फार संघर्ष केले. एके दिवशी लैला खानचे अवघे कुटुंब बेपत्ता झाले. लैलाचे वडील आणि सेलिनाचे दुसरे पती नादीर शाह पटेल यांनी त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांत केली. काही दिवसांनी पोलिसांनी सेलिनाचा तिसरा पती आणि लैलाच्या सावत्र वडिलांना अटक केली त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.
तपासादरम्यान परवेझ टाक याने संपूर्ण कुटुंबाचा खून करून इगतपुरीच्या फार्म हाऊसमध्ये पुरल्याचे पोलिसांना सांगितले. लैला खानने दुबईला जाऊन चुकीचे काम करावे, अशी परवेझची इच्छा होती. मात्र लैलाने यासाठी नकार दिल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला परवेझ ने ठार मारले.
या प्रकरणी सत्र न्यायालयाने नुकतेच आरोपींना दोषी ठरवून शिक्षेचा निर्णय राखून ठेवला होता. कोर्टात निकाल देताना आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण क्रूर हिंसक कृत्य मानून न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.