Marathi Biodata Maker

आमिरचे दिसणार तीन वेगवेगळे लूक

Webdunia
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान नेहमी हटके भूमिका करताना दिसतो. चित्रपटातील भूमिका खास ठरावी यासाठी या अभिनेत्याला  एका अवतारातून दुसर्‍या अवतारात शिरताना सगळ्यांनीच पाहिले आहे. त्यासाठी कधी त्याने पगडीबरोबर लांब दाढी धारण केली तर कधी खुल्या  केसांबरोबर दाढी, कधी क्रू कट लूक तर कधी आणखी काही. आता आपला आगामी चित्रपट लाल सिंग चढ्‌ढासाठी देखील तो असेच काहीतरी हटके प्रयोग करताना दिसून येणार आहे. लाल सिंगचड्ढा या चित्रपटासाठी लांब दाढी ठेवल्यानंतर आता तो अलीकडेच क्लीन शेव लूकमध्ये दिसून आला. आता तो पंजाबमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहे. आमिरच्या सरदारच्या लूकबरोबरच त्याच्या लांब दाढीतील लूकचीही प्रशंसा होत आहे.
 
लाल सिंग चड्ढा हा सिनमे फॉरेस्ट गम्प या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक असणार आहे. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटात आणीबाणीपासून, कारगिल युद्ध, पुलवामा हल्ला, उरी हल्ला, तेव्हापासून आतार्पंत बदललेली अनेक सरकारं या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या सिनेमात आमिरसोबत करिना कपूरसुद्धा दिसणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

'धुरंधर'च्या यशानंतर सारा अर्जुनचे नशीब उजळले; आता भन्साळीच्या मेगा प्रोजेक्टमध्ये मधुबालाची भूमिका साकारणार

Wildlife Sanctuaries in Goa उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना गोव्यातील या ठिकाणी फिरायला घेऊ जा

सलमान खानने नवीन धून गुणगुणल्याने 'मातृभूमी'मधील पुढील गाण्याबद्दलची उत्सुकता वाढली

गेम ऑफ थ्रोन्स फेम अभिनेत्याचे निधन

Fun Time गण्याने धोब्या कडे धोतर धुवायला टाकले

पुढील लेख
Show comments